नागपूर विभागाला पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक देण्यात यावा- आमदार सुधाकरराव अडबाले

Shreyash Wankhede:
आमदार सुधाकर अडबाले यांनी नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयाला पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक नसल्यामुळे व नगरपरिषद शाळांचे पगार काढणारे बाबू नसल्यामुळे त्यांचे मार्च महिन्यापासून पगार थकीत आहेत. अशा अनेक समस्या प्रलंबित असल्याचे आढळून आले. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग कार्यालयाला देण्यात यावा, अशी मागणी वरिष्ठांना केली. अन्यथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय नागपूरला भेट दिली असता २३ जून पासून शाळा सुरू करण्याबाबतची विचारणा केली. शिक्षण संचालनालय पूणे कडूनच आदेश आल्याचे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले. परंतु, जून महिन्यात ट्रॅव्हलिंग अलाउन्सची दोनच दिवसाची टॅब मध्ये तरतूद आहे व शिक्षकांच्या ७६ सुट्ट्यांबाबत विचारणा केली. सुट्ट्या पुढील सत्रात समायोजित करण्यात याव्या व सहा दिवसाच्या ट्रॅव्हलिंग अलाउन्सची टॅब मध्ये तरतूद करण्याची संचालनालयाला मागणी करून काढण्यात यावा, असे निर्देश दिले. शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. त्या सोडवण्यासाठी ३० जून २०२५ च्या आत सभा घेण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विद्यालय व क. महा. सिलेवाडा येथील श्री. पद्माकर राऊत यांना मुख्याध्यापक पदाचे मान्यतेचे पत्र ‘ऑन द स्पॉट’ देण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, प्रांतीय कोषाध्यक्ष भूषण तल्हार, विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महासंघाचे सहसचिव जगदीश जुनगरी, विमाशी नागपूर ग्रामीण अध्यक्ष अनिल गोतमारे, नागपूर जिल्हा कार्यवाह संजय वारकर, कार्याध्यक्ष विजय गोमकर, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत व्होरा, वैभव चिमणकर, सुहास गणवीर उपस्थित होते.








