Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeChandrapurधन्यवाद सुधीरभाऊ...! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला

मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता

सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार

Shreyash Wankhede: आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो, पण आमची कुणी दखलही घेतं नव्हते… त्यामुळे आमचा लढा विस्मृतीत गेला होता… पण सुधीरभाऊंनी आमचं ऐकलं, आमची वेदना समजून घेतली आणि तो आवाज विधानसभेत बुलंद केला. मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणविस सोबत भेटत निवेदन दिले. आज आमच्या संघर्षाला सरकारदरबारी मान्यता मिळाली, यामुळे एक अपूर्णतेची भावना पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटते,” अशा अत्यंत भावनिक शब्दांत लोकतंत्र सेनानींनी माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या हृदयस्पर्शी भेटीत सेनानींनी सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. २० हजार रुपयांच्या सन्मान निधीबद्दल कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानंतर, सेनानींच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले.

एक सेनानी म्हणाले, “सुधीरभाऊ कायमच गरीब, उपेक्षितांसाठी आवाज उठवत आलेत. आमच्या मागण्या त्यांच्या प्रयत्नांमुळेच सरकारदरबारी पोहोचल्या आणि राज्यभरातील ४ हजार १०३ लोकतंत्र सैनिकांना न्याय मिळाला. सुधीरभाऊमुळे आमचा लढा व्यर्थ गेला नाही याचं आज समाधान वाटतं.

या प्रसंगी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी केवळ माझं कर्तव्य निभावलं. तुमचा लढा देशासाठी होता, त्यामुळे राज्य सरकारने तुमचा मान राखावा, हे माझं वैचारिक उत्तरदायित्व होतं. उर्वरित मागण्यांसाठीही मी तुमच्यासोबतच उभा राहीन.’ या घोषणेनंतर उपस्थित सेनानींनी टाळ्यांच्या गजरात सुधीरभाऊ धन्यवाद म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page