
केंद्र सरकार योजनांचे लाभ आता थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत, डीबीटी प्रणालीने मध्यस्थांची भूमिका दूर केली आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांच्या सुविधेमुळे गरिबांना आरोग्य सुरक्षा मिळाली आहे. भारत आता संरक्षण उत्पादनांपासून डिजिटल सेवांपर्यंत सर्व गोष्टींचा निर्यातदार बनला आहे. देश आता जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि चौथ्या स्थानाकडे वाटचाल करत आहे. काश्मीरमधून ३७० हटवून अखंड भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर यासारख्या कामांमुळे भारताचा सांस्कृतिक वारसा मजबूत झाला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक कारभाराचे उदाहरण घालून दिले आहे. गरीब कल्याण, उज्ज्वला, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, किसान सन्मान निधी यांसारख्या योजना ऐतिहासिक पातळीवर राबविण्यात आल्या आहेत. ‘सेवा ही सरकार’ या मंत्राला अनुसरून मोदी सरकारने राजकारणात कार्यक्षमता आणि जबाबदारी प्रस्थापित केली आहे. जनता आता आत्मविश्वासाने म्हणते, “मोदी है, तो मुमकिन है”. तसेच बल्लारपूरमध्ये प्रथमच बूथ प्रमुखांसह दहा महिलांचा गट तयार करण्यात आला असून त्यात नव्वद बूथप्रमुख महिला असून त्यांच्या टीममध्ये एकूण १०८० महिलांचा एक गट तयार करण्यात आला असून, त्याची सुरुवात बल्लारपूर शहरातून झाली आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली जोशी म्हणाल्या की, ही टीम तयार करण्यात चंदनसिंह चंदेल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याचा परिणाम आगामी नगरपरिषद निवडणुकीत दिसेल. तसेच शहर भाजपा तर्फे पर्यावरण सप्ताहांतर्गत ५ जून ते १५ जून या कालावधीत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. २१ जून जागतिक योग दिनाअंतर्गत भाजपा व पतंजली योग समितीच्या वतीने एकदंत लॉन बल्लारपूर येथे सकाळी ६.३० वाजता आ.सुधीर मुनगंटीवार यांचा उपस्थित आयोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती, प्रत्येक बूथवर कार्यक्रमाचे आयोजन.२५ जून रोजी गांधी चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ आणीबाणीच्या विषयावर मा.आमदार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जून रोजी बल्लारपूर नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, शिवचंद्र द्विवेदी, काशीनाथ सिंह, मनीष पांडे,ॲड रणंजय सिंह, सतविंदरसिंह दारी, समीर केने, सतीश कनकम, किशोर मोहुर्ले, महिला आघाड़ी अध्यक्ष वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, सारिका कनकम, वर्षा सुचूवार, पूनम मोडक, आरती अक्केवार, कांता ढ़ोके, बेबीताई केसकर, प्रियंका शेड़े उपस्थित होते. पत्रकार परिषद चे संचालन देवेंद्र वाटकर तर आभार प्रदर्शन घनश्याम बुरड़कर यांनी केले.