मराठवाडा शिक्षक संघाची सेलू तालुका कार्यकारिणी जाहीर.
डॉ. संतोष मलसटवाड अध्यक्ष तर विजेंद्र धापसे सचिव.

श्रेयश वानखेडे: येथील अक्षदा मंगल कार्यालयात सोमवार ( दि. २३ ) रोजी मराठवाडा शिक्षक संघाची तालुका कार्यकारिणी निवड बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते उत्तमराव थोंबाळ हे होते. तर बैठकीस उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके, मुख्याध्यापक केशव टाकळकर, मुख्याध्यापक शिवलिंग वावरे, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, उपाध्यक्ष अमित मोगल, सचिव निशांत हाके यांची उपस्थिती होती. बैठकीत मराठवाडा शिक्षक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सेलू तालुका अध्यक्षपदी डॉ. संतोष मलसटवाड, उपाध्यक्ष सुभाष मोहकरे, सुनिल राठोड, सचिव विजेंद्र धापसे, तर कोषाध्यक्षपदी प्रा. महेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बैठकीला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद म्हणाले की, ” परभणी शिक्षण विभागातील भ्रष्र्टाचारामुळे परभणीची नामुष्की झाली आहे त्या मुळे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ आंदोलन उभारणार आहे. ” असे ते म्हणाले. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. संतोष मलसटवाड यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यकारिणी निवड बैठक यशस्वीतेसाठी बाबासाहेब हेलसकर, व्यंकट तोरणाळे, डॉ. सुरेश हिवाळे, संध्या फुलपगार, बाबासाहेब गोरे, योगेश ढवारे यांनी पुढाकार घेतला.