Sunday, April 19, 2026
Homeबल्लारपूरबामणी ग्रामपंचायत शिवनगर वॉर्डातील समस्यांसाठी SDM साहेबांना सभेची मागणी.
spot_img

बामणी ग्रामपंचायत शिवनगर वॉर्डातील समस्यांसाठी SDM साहेबांना सभेची मागणी.

बामणी ग्रामपंचायत शिवनगर वॉर्डातील समस्यांसाठी SDM साहेबांना सभेची मागणी.

300 लोकांच्या वस्तीला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी मैदानात.

श्रेयश वानखेडे:
आम आदमी पार्टी (AAP) बल्लारपूरने बामणी टी-पॉईंट येथील ब्रीज बांधकामामुळे शिवनगर वॉर्ड, बामणी ग्रामीण येथील सुमारे ३०० रहिवाशांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत आपचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. या वॉर्डातील नागरिकांसाठी आवागमनासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, जुन्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे, आणि रात्रीच्या वेळी मार्गावर प्रकाशाची सोय नसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आम आदमी पार्टी, बल्लारपूरने उपविभागीय दंडाधिकारी (SDM) साहेब, बल्लारपूर यांना गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी एक विशेष सभा आयोजित करण्याची विनंती केली आहे.
या बैठकीत खालील प्रतिनिधी उपस्थित असावेत अशी मागणी करण्यात आली आहे:
– NHAI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) प्रतिनिधी
– MSEBCL (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड) – उप कार्यकारी अभियंता साहेब
– BDO (गटविकास अधिकारी) साहेब
– बामणी ग्रामपंचायत सदस्य
– रोड कॉन्ट्रॅक्टर – इंचार्ज
– इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर – इंचार्ज
– BPQ पोलीस – निरीक्षक साहेब
आम आदमी पार्टीचा उद्देश शिवनगर वॉर्डातील नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणे आहे. ही बैठक आयोजित केल्यास वरील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना एकत्र आणता येईल अशी आशा आहे. ही माहिती आम आदमी पार्टी बल्लारपूरचे अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी दिली.
4 attachment  •  Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page