Monday, April 20, 2026
HomeEducationगुरुजनांना मानाचा मुजरा: सेवानिवृत्त शिक्षिकेचा सत्कार समारंभ थाटात संपन्न
spot_img

गुरुजनांना मानाचा मुजरा: सेवानिवृत्त शिक्षिकेचा सत्कार समारंभ थाटात संपन्न

गुरुजनांना मानाचा मुजरा: सेवानिवृत्त शिक्षिकेचा सत्कार समारंभ थाटात संपन्न

श्रेयश वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे सेवानिवृत्त झालेल्या जेष्ठ शिक्षिका सौ. भावना दुबे मॅडम यांचा गौरव पूर्ण सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 त्यांच्या 29 वर्षाच्या निस्वार्थ सेवेचा गौरव करताना शाळेतील प्राचार्या, शिक्षक व विद्यार्थी भावूक झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. असमा खान खलीदी मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर सेवा समितीचे सभासद सादिक जव्हेरी सर उपस्थित होते. कार्यक्रमाची  सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली असून सत्कारमूर्ती सौ. भावना दुबे मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
त्यांची शैक्षणिक वाटचाल आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम याचा आढावा घेणारे तसेच 26 वर्षापासून असलेले मैत्री  भावस्पर्शी शब्दात सांगताना शाळेच्या प्राचार्या असमा मॅडम भावनिक होऊन गहिवरल्या. तसेच सादिक जव्हेरी सर यांनी भावना मॅडम विषयी बोलताना म्हटले की, या शाळेतील विद्यार्थिनी चांगल्या पदावर कार्यरत असून यामागे शिक्षकांची मेहनत आहे अशा शिक्षकांची आम्हाला नेहमीच कमी जाणवतील. त्यासोबतच हर्षा मॅडम, अली मॅडम, विमल मॅडम, शबाना मॅडम, मोझरीया मॅडम यांनी सत्कारमूर्ती भावना मॅडम बद्दल विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती सौ.भावना मॅडम यांनी निरोप घेताना त्या भावूक झाल्या तसेच शाळेला मी सर्व चांगलं देण्याचे कार्य केले असे सांगून त्यांनी एक कविता म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना शेंडे मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ज्योती खोके मॅडम यांनी केले. हा निरोप समारंभ शिक्षकांच्या समर्पित सेवेचा सन्मान करत शिक्षक विद्यार्थी नात्याचा अनोखा अविष्कार ठरला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page