Sunday, April 19, 2026
Homeबल्लारपूरएक दिवसीय धम्म शिबीर संपन्न
spot_img

एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न

एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न

श्रेयश वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार बल्लारपुर येथे एक दिवसीय धम्मशिबीर संपन्न झाले. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी पद्मरत्न (भीसी) यांनी केले. सुरुवातीला धम्ममित्र संध्या गावंडे, विद्या लोहकरे, रत्नमाला जीवने यांनी त्रिशरण पंचशील आणि पूजा घेतली. मैत्रीभावना ध्यान सराव धम्ममित्र भास्कर भगत यांनी करवून घेतला. पहिल्या सत्रामधे धम्मचारी पद्मरत्न यांनी “शरणगमन” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि त्यावर गटचर्चा झाली. भोजन अवकाशानंतर दुस-या सत्रामधे “तीन बंधने आणि शरणग़मनाच्या पातळ्या” यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यावर गटचर्चा झाली.धम्ममित्र अशोक दुपारे, दिप्ती लोहकरे, रसीका वाघमारे,वनकरताई,लोहकरेताई आदी धम्मसहायकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सूत्रसंचालन भास्कर भगत यांनी तर आभार प्रदर्शन धम्ममित्र रवि कांबले यांनी केले. धम्ममित्र किशोर लोणारे यांनी धम्मपालन गाथेने वर्गाची सांगता केली. धम्मशिबीरात मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page