Tuesday, July 28, 2026
HomeEducationवाढीव स्थानिक सुट्ट्या बाबत बैठक संपन्न
spot_img

वाढीव स्थानिक सुट्ट्या बाबत बैठक संपन्न

वाढीव स्थानिक सुट्ट्या बाबत बैठक संपन्न

श्रेयश वानखेडे:

दिनांक २९ जुलै २०२५ रोज मंगळवारला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वाढिव स्थानिक सुट्टयाबाबत मा. राजेश पातळे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या दालनात माध्यमिकच्या सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिका-यांची सभा पार पडली.
संघटनेच्या पदाधिका-यांच्या मागणीप्रमाणे मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी ३ स्थानिक सुट्टया वाढवूण दिल्या व तसे  शुद्धीपत्रक काढूण सर्व माध्यमिक शाळांना कळविण्याबाबत आश्वासीत केले.
तीन स्थानिक सुट्टया
१) १६ आगष्ट-  शनिवार  गोपालकाला
२) ६ सप्टेंबर- शनिवार अनंत चतुर्दशी
३) २२ सप्टेंबर- सोमवार घटस्थापना

सदर सहविचार सभेला मुख्याध्यापक असोशियनचे जिल्हाध्यक्ष – श्री.नरेंद्र बोबडे‚
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष -विलास खोंड, चंद्रपूर महानगराचे कार्यवाह- वसंत वडस्कर, अध्यक्ष- मानकर सर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष-श्री. सुनिल शेरकी‚ कार्यवाह-सुरेंद्र अडबाले‚ कार्याध्यक्ष-श्री. जयंत टोंगे‚  शिक्षक भारती संघटनेचे- पुरूषोत्तम टोंगे, प्रजासत्ताक संघटनेचे मोटघरे सर, पंधरे सर, शिक्षकेत्तर संघटनेचे विनोद गावंडे सर उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page