Wednesday, July 29, 2026
HomeChandrapurभूमी अभिलेख कार्यालयात स्वागत समारंभ
spot_img

भूमी अभिलेख कार्यालयात स्वागत समारंभ

भूमी अभिलेख कार्यालयात स्वागत समारंभ

संकट काळातही प्रशासकीय जल्लोष; शासनाच्या आदेशांची पायमल्ली?

श्रेयश वानखेडे:
संपूर्ण ब्रम्हपुरी तालुका पुराच्या तडाख्यात सापडलेला असताना, नागरिक मदतीच्या प्रतिक्षेत असताना भूमी अभिलेख कार्यालयात मात्र उपअधीक्षकांच्या स्वागतासाठी जल्लोषमय सोहळा पार पडल्याची लोकचर्चा आहे.
पुरामुळे अनेकांचे संसार उघडे पडले, काहींना स्थलांतर करावे लागले, तर काहीजण अन्न-पाण्याच्या शोधात आहेत. अशा बिकट परिस्थितीत, एका शासकीय कार्यालयात थाटात स्वागत समारंभ होणे संतापजनक आहे.
संबंधित अधिकारी याआधी देखील ब्रम्हपुरीतच कार्यरत होते. बदलीनंतर पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या ‘पुनःस्वागत’ कार्यक्रमाचे आयोजन कार्यालयातच कर्मचाऱ्यांनी केले. हार-तुरे, पुष्पगुच्छ, खुर्चीवर बसवणे, फोटो-व्हिडीओचे प्रदर्शन आणि मुख्य म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर तो कार्यक्रम टाकल्याची चर्चा रंगली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page