Tuesday, July 28, 2026
HomeChandrapurलोकनेते आ.डॉ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम
spot_img

लोकनेते आ.डॉ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम

लोकनेते आ.डॉ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम

महानगरात विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

आ.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य

Shreyash Wankhede:
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी(दि.30)महानगरात विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे हे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मित्र परिवाराचे संयोजक राहुल पावडे यांनी केले आहे.
पावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आ.मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसानिमीत्य महानगरात भव्य रोग निदान,भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आयोजित लोकोपयोगी कार्यक्रमात
रुग्णांना फळ वाटप,वृक्षारोपण(64 स्थळी),गरीब विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटप(59 ठिकाणी),हनुमान मंदिर सुंदरकांड (2 स्थळी),मोफत पतंजलि योग प्रशिक्षण शिबिर (8 स्थळी),गरजवंतांना ब्लॅन्केट वाटप, ताडपत्री वाटप,वृक्षदिंडी,निबंध स्पर्धा,विविध दर्गाह मध्ये चादर पोशाई व लाडु वाटप,योग नृत्य परिवारां तर्फे प्रशिक्षण,विविध ठिकाणी भोजनदान,रेनकोट वाटप,विविध मंदिरात महाआरती(५१ स्थळी),डेबू सावली वृध्दाश्रमात भोजनदान,दिव्यांग संस्थेतील दिव्यांगाना भोजनदान,विविध बुध्द विहारात वंदना व साहित्य वाटप,विविध खेळातील उत्कृष्ट क्रिडापटूचा सत्कार,प्रशासकीय सेवेत उत्तम कार्य करणाऱ्यां उत्तम अधिकाऱ्यांचा सत्कार,आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार आदि कार्यक्रमाचा समावेश आहे,असे ते म्हणाले.
नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराने केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page