Tuesday, September 22, 2026
spot_img
HomeMaharashtraसंमोहनतज्ञ डॉ. अनराज जी. टिपले यांना राष्ट्रिय विदर्भ जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित

संमोहनतज्ञ डॉ. अनराज जी. टिपले यांना राष्ट्रिय विदर्भ जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित

संमोहनतज्ञ डॉ. अनराज जी. टिपले यांना राष्ट्रिय विदर्भ जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित

श्रेयश वानखेडे:
             युनिव्हर्सल टेलेंट बुक ऑफ रेकार्ड्स समृद्धी प्रकाशनाच्या सहकार्याने, राष्ट्रिय विदर्भ कला, सामाजिक परिषद आणि पुरस्कार सोहळा नागपूर- २०२५ यांच्या तर्फे विलोभनीय सत्कार सोहळा रविवार दिनांक ३ ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी १०. ३० वाजता मधुराम सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन श्री. फत्तेचंद मोर हिंदी भवन, राणी झाशी चौंक वधी रोड, नागपूर येथे मा. डॉ. रविंद्र कोल्हे, सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री – भारत सरकार( मेळघाट – अमरावती) ह्यांच्या हस्ते सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन पार पडला.
   मा. संमोहनतज्ञ डॉ. अनराज जी. टिपले चंद्रपूर यांचे सामाजिक, साहित्य,कला, सांस्कृतिक, तसेच संमोहन थेरपी, संमोहन स्टेज प्रोग्राम इत्यादि क्षेत्रात अतुलनिय योगदान पाहून त्यांना राष्ट्रीय विदर्भ जीवनगौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले
या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर कु. कल्पना मनोहर सुर्यवंशी मॅडम( सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण प्राथमिक विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर), आचार्य- परमानंद हि. तिराणीक, कलाशिक्षक अंधविद्यालय आनंदवन, वरोरा, श्री प्रविण कापसे, कलाशिक्षक नारायणास्कुल, नागपूर. डॉ. प्रिती साव, न्युरालाजीस्ट, भद्रावती. यांनी संमोहनतज्ञ डॉ. अनराज जी. टिपले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला व पुढील आयुष्यात आशा प्रकारे कार्याची प्रगती होत रहावी, याकरिता शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page