Sunday, April 19, 2026
HomeChandrapurशिक्षकांचा पगार न होण्यासाठी अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद...
spot_img

शिक्षकांचा पगार न होण्यासाठी अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर जबाबदार

शिक्षकांचा पगार न होण्यासाठी अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर जबाबदार

मुलीच्या चुकीमुळे वडिलांची इज्जत रस्त्यावर

दिनांक 27/06/2025  च्या शासन निर्णयानुसार अति संवेदनशील भत्ता( प्रोत्साहन भत्ता)व एक स्तर वेतनश्रेणी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वरील परिपत्रकाप्रमाणे दिनांक 27 ते 30 असे चार दिवसाचे  रिकवरी केल्याचे चेंज स्टेटमेंट पे युनिट कडून अधीक्षक वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कडून न गेल्यामुळे पगाराला विलंब झाला आहे. पण दिनांक 4 ऑगस्ट 2025  चेंज स्टेटमेंट  कोषागार कार्यालयाला  नेऊन दिले आहे.तरी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पगार 10 ते 11 तारखेच्या दरम्यान होतील असा अंदाज वर्तवला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एक नामांकित लोकप्रतिनिधी या वेतन अधीक्षक ला आपली मुलगी समजतात( चर्चा), तर मुलीच्या चुकीमुळे शिक्षकाचे जे पगार उशिरा होण्याची बाब समोर आली आहे. त्याच्यामुळे हे कर्मचारी रक्षाबंधन बहिणीला ओवाळनी टाकण्यापासून वंचित होणार असल्याची बाब समोर आलेली आहे.
 मान. अधीक्षक वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचा चार्ज असताना व वरोऱ्याच्या बोगस आयडी वाल्यांचे  मार्च 2024 चे पगार काढताना बरोबर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
बोगस शालार्थ आयडी धारक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकाचे  एरियस सहित पगार काढताना या मान. अधीक्षक वेतन पथक माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे डोके बरोबर काम करत होते. यामध्ये विशेष बाब अशी येत आहे की, एकस्तर पदोन्नती फक्त जनरल मधून आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना लागू होत आहे. चुका केल्याने मागील वेळेस  रिकवरी करण्यात आले होते. या सर्व बाबीला मान. अधिक्षक, वेतन पथक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर जबाबदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page