Saturday, April 18, 2026
HomeFraudचंद्रपूर जिल्ह्यात शासनाच्या तिजोरीवर डल्ला
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात शासनाच्या तिजोरीवर डल्ला

चंद्रपूर जिल्ह्यात शासनाच्या तिजोरीवर डल्ला

नागपूर विभागांतर्गत कार्यरत शिक्षकाने अवैधरीत्या नियमित डी. एड. किंवा बी. एड. केल्यास त्यांचेवर कारवाई न केल्यामुळे संबंधित शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी- डॉ. माधुरी सावरकर

ए. एम. (मास्टर ऑफ आर्टस) मधेही भ्रष्टाचार

 

डॉ. माधुरी सावरकर शिक्षण उपसंचालक, कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या स्वाक्षरीचे पत्र क्रमांक शिउसं/ माध्य- अ/ सेवेतबीएड/4003/ 2025 दिनांक 17 जुलै 2025 माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना प्राप्त झाले आहे. त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कार्यरत शिक्षकाने नियमित बी.एड. केल्यास एकास वेळेस दोन आस्थापनेवर/ ठिकाणी हजर राहिलेल्या शिक्षकांचे बी.एड. या कार्यालयाद्वारे यापूर्वी सुद्धा अमान्य करून त्यांना बी. एड. चे लाभ नाकारण्यात आले आहे. नागपूर विभागामध्ये हजारो शिक्षकांनी शाळेत नियमित कार्यरत असताना बी.एड.चे उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मुक्त विद्यापीठा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातून बी.एड. चे शिक्षण पूर्ण केले आहे जे अवैध ठरते. त्यामुळे त्याला मान्यता/ लाभ देता येत नाही.

अशा प्रकारे सेवेत राहून नियमित बी.एड. केलेल्या शिक्षकांवर केलेल्या कारवाईचा अहवाल आपल्या कार्यालयास सादर करण्यात यावा असे आदेश नागपूर विभागांतर्गत सर्व शिक्षण अधिकारी यांना आधी देण्यात निर्गमित करण्यात आले होते. पण सर्व शिक्षण अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही व संस्था/ शाळा/ शिक्षकांना वाचवण्यासाठी गैरप्रकार लपवून ठेवला. तसेच अशाप्रकारे अवैधरित्या बी.एड. प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा लाभ अनेक शिक्षक घेत असून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहे. नियमित शिक्षक असूनही नियमित बी.एड. कॉलेजमधून बी.एड. पूर्ण केले असल्यामुळे त्यांचे बीएड अमान्य करण्यात यावे व त्याचा लाभ घेतल्यास वेतनातून वसूल करण्यात यावे असे श्री. हेमंत गांजरे यांच्या तक्रारीत नमूद आहे. तरी सदर प्रकरणी नियमानुसार कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ पत्र प्राप्त होतात सात दिवसाच्या आत कार्यालयात सादर करावा.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीत असताना चित्रकला शिक्षकांनी याच प्रकारे पदवी घेतली आहे. नियमित उपस्थिती दाखवून शैक्षणिक पात्रता मिळविली. विशेष शिक्षक, हायस्कूल विभाग वेतनश्रेणी मिळविली. आजची वेतन श्रेणी ३८६००-१२२८००, जुनी वेतन सहावा वेतन आयोग ९३००- ३४०००, पाचवा वेतन आयोग श्रेणी १४००-२६०० याप्रमाणे आहे.

      वेतनश्रेणीचे वाटेकरी शाळेत कधीच न शिकविणारा संघटनेचा नेता-एक लक्ष, संस्था संचालक-एक लक्ष, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री. संजय डोर्लीकर-पन्नास हजार वाटेकरी असल्याचे चर्चेअंती समजते.

शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांचे पत्र दिनांक १७ जुलै २०२५ नुसार याबाबत सुद्धा चौकशी झाली पाहिजे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page