Jyotsna Wankhede
दि. 15/09/2025 रोजी क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे पोलीस भरतीची पूर्वतयारी म्हणून आयोजित आदर्श/मॉडेल परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परीक्षेचे आयोजन श्री सुधीरभाऊ यूथ क्लब, बल्लारपूर व छत्रपती संभाजी राजे अकादमी, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 195 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

टॉप-3 पुरुष स्पर्धक :

श्री. आशीष मोहुर्ले

श्री. सागर सातपुते

श्री. जयराज राठोड

टॉप-3 महिला स्पर्धक :

कु. सुभांगी शतपालकर

कु. जयश्री बुच्चे

कु. भाग्यश्री बुच्चे
सर्व विजेत्यांचा सत्कार ७२-बल्लारपूर विधानसभा प्रमुख मा. श्री. चंदनसिंह चंदेल, भाजप बल्लारपूर मंडळ अध्यक्ष ऍड. रणंजय सिंह व श्री. अजहर शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मा. श्री. चंदनसिंह चंदेल यांनी सर्व स्पर्धकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच माजी अर्थ व वनमंत्री डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्ये राष्ट्रीय स्तराचे स्टेडियम उभारण्याच्या संकल्पनेचे मनापासून कौतुक केले.
आयोजन समिती :
श्री. मिलिंद प्रजापती, श्री. अक्षय चामलवार, श्री. ओमप्रकाश जी, श्री. प्रतिल काळे, श्री. सुनील माजी, श्री. नितीन वर्मा, मो. अल्ताब, श्री. भाविक टेकाम, श्री. विश्वास बलावार, एकमेव कुंदावार व संपूर्ण टीम.
यशस्वी आयोजनाबद्दल भाजप बल्लारपूर मंडळ अध्यक्ष ऍड. रणंजय सिंह यांनी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.