Thursday, April 23, 2026
Homeबल्लारपूरभा.ज.पा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त चना प्रसाद वितरण कार्यक्रमाचे भव्य आयोजन
spot_img

भा.ज.पा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त चना प्रसाद वितरण कार्यक्रमाचे भव्य आयोजन

भा.ज.पा बल्लारपूरतर्फे माता राणी विसर्जनानिमित्त चना प्रसाद वितरण कार्यक्रमाचे भव्य आयोजन

Jyotsna Wankhede:

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर मंडळ तर्फे माता राणीच्या विसर्जनानिमित्त भव्य चना प्रसाद वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी मंत्री, म.रा.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मा. डॉ. मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते माता राणीच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या मंडळ अध्यक्षांचा माता की चुनरी, हार व गिफ्ट किट देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. चंदनभैया चंदेल (माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ), मा. हरीशजी शर्मा (भाजपा जिलाध्यक्ष, चंद्रपूर ग्रामीण) आणि अॅड. रणंजय सिंह (भाजपा शहराध्यक्ष, बल्लारपूर) उपस्थित होते.

कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

यामध्ये श्री शिवचंद दिवेदी, श्री काशिनाथ सिंह, श्री राजू दारी, श्री निलेश खरबडे, श्री समीर केने, श्री जगदीश गहेरवार, श्री रामधन सोमानी, श्री अशोक गुप्ता, श्री हनुमान सिंह, श्री शंकर कम्पेल्ली यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

भा.ज.पा शहर पदाधिकारी म्हणून

महामंत्री श्री मनीष पांडे, श्री सतीश कनकम, श्री घनश्याम बुरडकर, उपाध्यक्ष श्री गुलशन शर्मा, श्री राजू दासरवार, श्री सचिन जाधव, श्री प्रभदीप सचदेवा, श्री नीरज झाडे, सचिव श्री दशरफ येल्लैया, जनाब नफीस अन्सारी, श्री सुरेन्द्र खडका, श्री बबलू गुप्ता, श्री किशोर मोहुर्ले, श्री पूनमचंद बहुरिया,

तसेच विविध मोर्च्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महिला मोर्चा टीम तर्फे अध्यक्षा सौ. वैशाली जोशी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्त्या सहभागी झाल्या. या प्रसंगी सौ. रेणुका दुधे, सौ. आरती अक्केवार, सौ. वर्षा सुन्चुवार, सौ. कांता ढोके, सौ. सारिका कनकम, सौ. सुरेखा श्रीवास्तव आदींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

युवा मोर्चा अध्यक्ष श्री मिथलेश खेंगर यांच्या नेतृत्वाखाली महामंत्री श्री रामेश्वर पासवान, श्री विशांक ठाकुर, श्री अरविंद वर्मा, श्री पवन दिवेदी, उपाध्यक्ष श्री चंदन गहेरवार, सचिव श्री कनकम, श्री नितीन बहुराशी, तसेच शहरातील असंख्य तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दिनांक : ३ ऑक्टोबर २०२५

वेळ : सायं. ५:०० वाजता

स्थळ : आर्य भवन समोर, वस्ती विभाग, बल्लारपूर

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. माता राणीच्या कृपेने संपूर्ण वातावरण भक्तिभावाने व उत्साहात रंगले होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page