जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आसाराम लोमटे.
सेलूत १६ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन.
Jyotsna Wankhede: शहरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान, सेलू आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सेलूत होणार आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचे भूमिपुत्र. इडा पिडा टळो, अलोक, वाळसरा ( कथासंग्रह ), धूळपेर ( ललित ), तसनस ( कादंबरी ) चे लेखक. राज्य वाङमय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांची जिल्हा स्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे.
सेलू शहरात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन आयोजना संदर्भात नूतन विद्यालयाच्या कै. रा.ब.गिल्डा सभागृहात डॉ. एस.एम. लोया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत पहिले अक्षर साहित्य संमेलनाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संयोजन समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्याध्यक्षपदी रामराव निकम, स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष जयप्रकाश बिहाणी, महेश खारकर, करूणा बागले, मुख्याध्यापक निशा पाटील, कोषाध्यक्ष डॉ. सतीश मगर, एकनाथ जाधव, सचिव डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर तर समन्वयक म्हणून डॉ. काशिनाथ पल्लेवाड, अजित मंडलिक यांची निवड करण्यात आली. साहित्य संमेलन यशस्वीते साठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. ललिता गिल्डा, विजया कोठेकर, कांचन बाहेती, संतोष कुलकर्णी, डॉ. राजाराम झोडगे, भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, प्रा. संजय पिंपळगावकर, डॉ. मोहन काटकर, बाळू बुधवंत, रवी किरण गंभिरे, डॉ. जयश्री सोन्नेकर, सुरेखा आगळे, रवी मुळावेकर, रवी कुलकर्णी, संजय विटेकर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, माधव गव्हाणे, किर्ती राऊत, संध्या फुलपगार, सुभाष मोहकरे, गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, किशोर कटारे, डॉ. अशोक पाठक, विजय चौधरी, विजय ढाकणे, कल्याण पवार, आणि विविध समित्यातील सदस्य साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
चौकटीचा मजकूर
साहित्य रसिकांसाठी कार्यक्रमाची मेजवानीमराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने अक्षर प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनाच्या पुर्वसंध्येला शनिवार ( दि. १५ ) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महिला मंडळ आयोजित ‘ संतवाणी ‘ कार्यक्रम होणार आहे. संमेलनाच्या दिवशी रविवार ( दि. १६ ) नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी निघणार आहे. संमेलनात परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकथन, बालकट्टा, परभणीचे अंतरंग कवी कट्टा, गझल मुशायरा असणार आहे. जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलनास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर ( लासलगाव ), डॉ. मार्तंड कुलकर्णी ( किनवट ), प्रा. श्रीधर नांदेडकर ( छत्रपती संभाजीनगर ), डॉ. राजेश गायकवाड ( परभणी ), बालरंग भूमीच्या अध्यक्ष नीलम शिर्के, नामदेव कोळी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड ( मुंबई), प्रसिद्ध कथाकार विलास सिंदगिकर ( लातूर ) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.