Saturday, December 6, 2025
HomeParbhaniशेत आखाड्यावर झालेल्या हल्ल्यात एक युवक ठार.
spot_img

शेत आखाड्यावर झालेल्या हल्ल्यात एक युवक ठार.

शेत आखाड्यावर झालेल्या हल्ल्यात एक युवक ठार.

Jyotsna Wankhede: दि 23 ऑक्टो.रोजीच्या  मध्यरात्री दोन ते तीन अज्ञात आरोपींनी बोरी रोडवरील वालुर शेत शिवारातील आसाराम रानबा सोनवणे यांच्या आखाड्या वर हल्ला करून तेथे झोपलेला फिर्यादीचा मुलगा संतोष आसाराम सोनवणे ( २४ ) यास गजासारख्या हत्याराने डोक्यात व मानेवर मारून ठार केले .व सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ३०,५००/- रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसभर शेतात काम करून सर्व कुटूंबीय झोपले असता रात्री १ च्या सुमारास चड्डी बनियन घातलेल्या दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी सदरील प्रकार केला. संतोष ला जीवे मारल्यानंतर त्याची आई वछलाबाई हिचे अंगावरील सोन्याचे दागिने व नगदी रुपये जबरीने चोरून नेले. सदर शेता जवळ असलेल्या कृष्ण मंदिरातील दत्तात्रय भोकरे व सरुबाई भोकरे यांना देखील मारहाण करून जखमी केले. आसाराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोन ते तीन अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 103(1),311,309(6),3 (5) BNS नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक  दीपक बोरसे पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी ,पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बेनिवाल,दिपककुमार वाघमारे स्थानिक गुन्हा शाखेचे विवेक पाटील यांनी भेट देऊन तपासा बाबत सूचना दिल्या आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page