Saturday, December 6, 2025
HomeChandrapurअँग्रोव्हिजन ही विदर्भाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने उभारलेली व्यापक चळवळ : सुधीर मुनगंटीवार
spot_img

अँग्रोव्हिजन ही विदर्भाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने उभारलेली व्यापक चळवळ : सुधीर मुनगंटीवार

अँग्रोव्हिजन ही विदर्भाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने उभारलेली व्यापक चळवळ : सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय कृषी महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

Jyotsna Wankhede: ॲग्रोव्हिजन हे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्री लोकनेते ना. नितीनजी गडकरी यांनी उचललेले यशस्वी पाऊल असून विदर्भाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने उभारलेली व्यापक चळवळ आहे, या कृषी महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले आहे.
शेती, संशोधन, संस्कृती आणि समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरेल. अँग्रोव्हिजन केवळ प्रदर्शनापुरती ही चळवळ मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या समस्यांचे मार्गदर्शन आणि मार्गक्रमण हे मुख्य उद्दिष्ट या संस्थेच्या स्थापनेमागील आहे.मध्य भारतातील सर्वात मोठ्या अँग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाचे नागपूर येथे 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात होणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद याबाबत जनजागृतीसाठी अँग्रोव्हिजन जिल्हा समिती व किसान मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रामबाग येथील वन विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी समिती सदस्यांशी संवाद साधला.
अँग्रोव्हिजन चे समन्वयक व जनसंपर्क अधिकारी श्री नितीन कुळकर्णी यांनी बैठकीत सविस्तर माहिती दिली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्यांच्यार्यंत पोहोचविण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी 17 वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या ॲग्रोव्हिजन ला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, त्यांना प्रशिक्षण मिळावे आणि जागतिक दर्जाच्या कृषी विषयक चर्चा घडवून याव्यात यासाठी आयोजित लाखो शेतकरी, उद्योजक आणि तज्ज्ञ या उपक्रमात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि नवतंत्रज्ञान या कृषी प्रदर्शनात मिळणार आहे.
उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व स्टार्ट अप मध्ये काम करणाऱ्या तरुणांना प्रेरणा यातून मिळेल असा विश्वास श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीला भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री बंडू गौरकार, रवी चहारे, अनिल मोरे,नरेंद्र आमने, प्रमोद कडसकर, विजय गुरनुले, निनाद गड्डमवार, मधुकर भलमे, विठ्ठल परसूटकर, भालचंद्र वडस्कर, वाघुजी गेडाम हे उपस्थित.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page