Jyotsna Wankhede:
श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहर यांच्या वतीने दिवाळी निमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला आदरणीय श्री हंसराजजी अहिर साहेब, अध्यक्ष – केन्द्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार यांच्या मार्गदर्शन लाभले.
यावेळी मा. करणजी देवतळे (आमदार वरोरा-भद्रावती), भाजप नेते डॉ. अशोकजी जिवतोडे, मा. रविंद्रजी शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), मा. रमेशजी राजूरकर (विधानसभा प्रमुख), मा. अशोकजी हजारे (जेष्ठ नेते), प्रा. धनराजजी आस्वले (अध्यक्ष, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट), तसेच भद्रावती ग्रामिण अध्यक्ष श्री श्यामसुंदर उरकुडे, श्री दयानंद जांभूळे, शहर अध्यक्ष श्री सुनिल नामोजवार, महिला अध्यक्षा रक्षीता निरांजने, शहर अध्यक्षा वृषाली पांढरे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती कृउबास सभापती राजू डोंगे, भद्रावती प.स. माजी सभापती प्रविण ठेंगणे, भद्रावती कृउबास उपसभापती अश्लेषा जिवतोडे भोयर, भद्रावती न.प. माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष पाम्पट्टीवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
भद्रावती तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला, युवा, व्यापारी विंगचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री पांढरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पाम्पट्टीवार साहेब यांनी केले. स्नेहभोजनासह कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात करण्यात आली.