बल्लारपूर शहरात अतिक्रमण काढणे चालू आहे. परंतु आलापल्ली- बल्लारपूर- नागपूर रोडवर असलेल्या तहसील, उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशन या कार्यालयाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत असून, त्या मात्र तेथून हटण्यास तयार नाही.
अतिक्रमणाचे काढणे कार्य संपल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी दुकान लावण्याची शक्यता नाकारता येत नाही असे चित्र दिसत आहे.
एक तर या मार्गावर सर्विस रोडचा अता पत्ता नाही. कारण सर्विस रोडवर पेट्यामधून दुकानाची कल्पना सांगणारे लोकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे.
तहसील, उपविभागीय अधिकारी व पोलीस स्टेशन याच्या जवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांनी पेट्या ठेवल्या असताना, त्या तेथून हटत नाही हा संशोधनाचा विषय आहे.