Monday, August 3, 2026
spot_img
Homeबल्लारपूरपदवीधर मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अडथळे; तांत्रिक अडचणी दूर कराव्यात – समीर...

पदवीधर मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अडथळे; तांत्रिक अडचणी दूर कराव्यात – समीर केने यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पदवीधर मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अडथळे; तांत्रिक अडचणी दूर कराव्यात – समीर केने यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jyotsna Wankhede:
पदवीधर मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र मतदारांना अर्ज सादर करण्यात अडथळे येत आहेत. नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी पोर्टलवरील वारंवार तांत्रिक त्रुटी, OTP पडताळणीतील समस्या आणि दस्तऐवज अपलोड न होण्याच्या अडचणींमुळे प्रक्रिया सुरळीत होत नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य समीर केने यांनी निवडणूक आयोगाकडे या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.
“पहिल्या टप्प्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर इतकी जवळ आली असताना नोंदणी प्रक्रियेत अडथळे राहिल्यास अनेक पात्र पदवीधर वंचित राहू शकतात. त्यामुळे सर्व्हर क्षमतेत वाढ करून पोर्टल स्थिर करणे, तांत्रिक सहाय्य केंद्र सुरू करणे आणि हेल्पलाइन तसेच व्हिडिओ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.”
 “मतदार नोंदणी हा लोकशाही प्रक्रियेचा पाया आहे. तांत्रिक कारणांमुळे पात्र मतदारांना नोंदणीपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही. आयोगाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.” अशी
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page