*पोलीस स्टेशन कोरपना यांची धडक कारवाई – 10 नग सुगंधित होला हुक्का शीशा पॉकेट वाहनासह जप्त*
*ज्योत्स्ना वानखेडे*
पोलीस स्टेशन कोरपना हद्दीत *दि. 24/07/2026 रोजी* मा. पोलीस अधीक्षक सा. यांच्या आदेशाने *रात्री 21:00 ते 00:00 वा.* पर्यंत रेकॉर्ड वरील आरोपी व संशयीत वाहने चेक करणे करीता गोपनिय माहितीच्या आधारे खाजगी वाहनाने पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना,
*वाहन क्र. MH.34 CD.9190 ईको गाडीने* सुगंधित तंबाखू कोरपना येथे वाहतुक करीत आहे अशी गोपनिय माहिती मिळाली.
त्या माहितीवरून *मौजा कन्हाळगाव फाटा* येथे नाकाबंदी केली असता सदर गाडीस थांबवून गाडीची झडती घेतली असता,
वाहनामध्ये *10 नग सुगंधित होला हुक्का शीशा पॉकेट* मिळून आले.
याबत पंचनामा करून *वाहनासह 10 नग सुगंधित होला हुक्का शीशा पॉकेट ताब्यात* घेण्यात आले.
*जप्त मुद्देमालाची किंमत:*
1. *10 नग सुगंधित होला हुक्का शीशा पॉकेट* – अंदाजे किंमत रु. 18,000/-
2. *ईको वाहन* – किंमत रु. 3,00,000/-
*एकूण जप्त मुद्देमाल:* रु. 3,18,000/-
*गुन्हा दाखल:*
याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध *अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 30(2), 26(2)(अ), 59(1), 3,4* अन्वये पोलीस स्टेशन कोरपना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
*पोलिसांचे म्हणणे:*
पोलीस स्टेशन कोरपना यांच्याकडून करण्यात आलेल्या या तत्पर कारवाईमुळे प्रतिबंधीत तंबाखू वर आळा घालण्यात आला आहे.
*ही कारवाई कोणी केली?*
मा. पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपानी*, सा. चंद्रपूर
मा. अपर पोलीस अधीक्षक *श्री. ईश्वर कातकडे*, सा. चंद्रपूर
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी *श्री. रवींद्र जाधव*, सा. यांच्या मार्गदर्शनात
पोलीस निरीक्षक *लता वाडीवे* मॅडम,
पो.अं. *सटवा नामपल्ले* ब.नं. 554,
पो.अं. *विशाल मोरे* ब.नं. 1656,
पो.अं. *लक्ष्मण नुनूंचे* ब.नं. 1668 यांनी केली.