Friday, December 12, 2025
HomeParbhaniनागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास किसान मोर्चा व शेतकऱ्यांचा पाठिंबा.
spot_img

नागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास किसान मोर्चा व शेतकऱ्यांचा पाठिंबा.

नागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास किसान मोर्चा व शेतकऱ्यांचा पाठिंबा.

Jyotsna Wankhede: संपूर्ण कर्जमुक्ती साठी नागपूर येथे बच्चू कडू व किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वा खाली 28 आक्टोबर पासून शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन चालू आहे फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करावी,सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र तात्काळ चालू करावेत या सह इतर मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी,दिव्यांग,कष्टकरी समुदाय नागपूर येथे ऊन पाऊस थंडी वारा याची पर्वा न करता हजारोंच्या सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी फडणवीस सरकार न्यायालयाच्या आडून वार करण्याचा प्रयत्न करत असून त्याचा या वेळी तिव्र धिक्कार करण्यात आला नागपूर आंदोलनातील मागण्यांसाठी आज दि ३० ऑक्टोबर रोजी सेलू तहसिल कार्यालयासमोर किसान मोर्चाच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली .यावेळी नायब तहसीलदार मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले फडणवीस सरकारने तातडीने कर्जमुक्तीची करावी नसता शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची व्याप्ती व तिव्रता वाढत जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ रामकृष्ण शेरे पाटील जयसिंग शेळके रोहिदास हातकडके ज्ञानेश्वर पौळ लक्ष्मणराव बरसाले संपतराव कटारे कल्णान कदम खंडेराव घुमरे विशाल काळे प्रकाश कव्हळे, हरीभाऊ सोनवणे, पंजाब गाडेकर, प्रकाश डोंबें, मारुती साखरे, गोपाळ कदम, उद्धव नाना पौळ, कैलास कटारे उद्धव डोंबे, नरेश साखरे सह पंडित आवटे, रंगनाथ ताठे अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page