Wednesday, April 15, 2026
HomeParbhaniलॉयन्स क्लब ऑफ सेलू च्या महिला क्रिकेट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद.
spot_img

लॉयन्स क्लब ऑफ सेलू च्या महिला क्रिकेट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद.

लॉयन्स क्लब ऑफ सेलू च्या महिला क्रिकेट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद.

वुमन्स युथ विजेता, डॉक्टर वुमन्स उपविजेता, तर चिरायू वुमन्स तृतीय.

ज्योत्स्ना वानखेडे:  जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक 8 मार्च रोजी लॉयन्स क्लब ऑफ सेलू च्या वतीने आयोजित वुमन्स बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेत आठ महिला संघांनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला. पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तर दृष्टी लॉयन्स नेत्रलयाचे मनोहर खालापुरे व सौ.संजीवनी खालापुरे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघांना आस्था ॲन्ड ग्रुप प्रथम  रोख रू. 2001/-  , डॉक्टर वुमन्स ब्लॅक वॉरीअर्स द्वितीय रू. 1501 /- व चिरायू वुमेन्स स्टाफ तृतीय रू.1001/- रोख पारितोषीके ,ट्रॉफी व प्रशस्तीपत्र  देऊन गौरविण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ बाळासाहेब जाधव , उपाध्यक्ष अजित सराफ,जेष्ठ क्रीडा मार्गदर्शिका सौ.संगिता खराबे- टेंगसे, गोल्डन मेंबर डॉ.आशिष मेहता, दत्तात्रय सोळंके, डॉ.कुंदन राऊत,डॉ आवटे,खुशाल तांगड़े,राहूल राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून निलेश मुंदडा, राजेश शर्मा, अभिजित चव्हाण यांनी काम पाहिले. प्रास्ताविक डॉ . बाळासाहेब जाधव सुत्रसंचालन भगवान पावडे तर सुभाष मोहकरे यांनी आभार मानले.सेलू शहरात पहिल्यांदाच लॉयन्स क्लबच्या वतीने महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.. विजेत्या संघात आस्था मेहता , तेजल पटेल, मोनिका कवाडे, मयुरी थोरे, नेहा कुंदनानी, स्वराली उन्हाळे, तर उपविजेत्या संघात डॉ प्रिती मेहता, डॉ अंजली जाधव, डॉ सुकन्या भाबट, डॉ नेहा मुंडे, डॉ माधुरी कामखेडे, डॉ पुजा काकड, डॉ शितल दोडीया, डॉ वर्षा गिरी, डॉ रुपाली मालाणी यांनी बहारदार खेळ केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page