Saturday, December 6, 2025
HomeParbhaniलोअर दुधना धरणातून विसर्ग, वालूर रस्ता बंद.
spot_img

लोअर दुधना धरणातून विसर्ग, वालूर रस्ता बंद.

लोअर दुधना धरणातून विसर्ग, वालूर रस्ता बंद.

Jyotsna Wankhede  : तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन- तीन दिवसापासून सुरू असले ल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्या ने गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सेलू राजवाडी ब्राह्मणगाव मार्गे वालूर रस्ता बंद पडला आहे. अशी माहिती डुघरा येथील सरपंच रमेश तारडे यांनी दिली आहे. यामुळे इतर वाहनाप्रमाणे पाथरी आगाराची वालुर मुक्कामी असलेली बस या मार्गा ऐवजी वालुर हातनूर मोरेगाव मार्गे सेलू सोडण्यात आली आहे. त्यानंतर या दोन्ही मार्गावरील बस फेऱ्या बंद असल्याचे समजते. लोअर दुधना प्रकल्पाचे गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता धरणाचे गेट क्रमांक १ ते ५ व १६ ते २०अश्या १० दरवाजातून ०.२० मीटरने उघडण्यात आले असून ६७५० इतका विसर्ग दुधना नदी पात्रात सुरू आहे. तरी देखील पाणलोट क्षेत्रातील वाढती आवक लक्षात घेऊन गेट क्रमांक ६ व १५हे गुरुवारी सकाळी ८ वाजता ०.२० मीटरने उघडण्यात येऊन १३५० क्युसेक असा एकूण ८हजार १०० क्युसेक विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांनी तसेच सेलू वालूर मार्गावरील राजवाडी ब्राह्मणगाव दरम्यान असलेल्या पुलावर अनुचित प्रकार टाळण्या साठी सतर्क राहण्याचे आवाहन पुर नियंत्रण कक्ष व सेलू पोलीसां च्या वतीने करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page