अमरावती शहर आंतरराष्ट्रीय एम.डी.ड्रग्स तस्करीचे हब बनत आहे – आ.संजय खोडके
डीआरआय ने केला पर्दाफाश.. तरीही अमरावती पोलीस विभाग ठप्प
अमरावती पोलीस प्रशासनात सातत्याने बदल करण्याची गरज -आ. संजय खोडके
ज्योत्स्ना वानखेडे :फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यातमध्ये महसूल गुप्तचर संघटनेने अमरावती शहरात धाड टाकून १० कोटींचा एम.डी. ड्रग्स साठा जप्त जप्त करीत शहरातील ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश केला. या गंभीर प्रकरणाला घेऊन राज्यअधिवेशनात लक्षवेधी लावत असतांना हा विषय संबधित विभागाकडे जातात नुकतीच महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकीत अमरावती शहरातून ३ कोटींचा एम.डी. ड्रग्स साठा जप्त केला. अमरावती शहर आंतरराष्ट्रीय एम.डी.ड्रग्स तस्करीचे हब बनत असतांना मात्र अमरावती शहर पोलीस, संबंधित विभाग व पोलीस स्टेशन हे ठप्प बसले आहेत. असे सांगून आमदार संजय खोडके यांनी शहरातील एम.डी. ड्रग्स तस्करीबाबत राज्यविधिमंडळातून सर्जिकल स्ट्राईक केली.
राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आ.संजय खोडके यांनी अमरावती मधील एम.डी. ड्रग्स तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाचे काय धोरण आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी संभागृहा समक्ष सांगितले कि, अमरावती शहरामध्ये फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यामध्ये महसूल गुप्तचर संघटनेने अमरावती शहरात धाड टाकून १० कोटींचा एम.डी. ड्रग्स साठा जप्त केला. यावेळी त्यांनी शहर पोलीस विभागाला माहिती देऊन ही कारवाई केली. यापूर्वी सुद्धा अमरावती शहरात एका वर्षात २० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती शहरात काही टोळी सक्रिय असून त्या शहरातील विविध भागात ड्रग्स ची विक्री करत असतात. मात्र ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्स विक्री होते , तेथील पोलीस मात्र याबाबत ठप्प असून अमरावती शहरात पोलिसातील बडे अधिकारी यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने अमरावती शहर ड्रग्स तस्करीचे हब बनत चालले असल्याचे आ. संजय खोडके यांनी सभागृहा समक्ष स्पष्ट केले. या संदर्भात आपण अधिवेशनात लक्षवेधी लावून धरत असतांना जेव्हा हा विषय संबंधित विभागाकडे जातो, त्यानंतर लगेच अमरावती शहरात गुन्हे शाखेने धाड टाकून नागपुरी गेट ठाण्या हद्दीतून ३ कोटींचा एम.डी. ड्रग्स साठा जप्त केला. ज्या पोलीस स्टेशन मध्ये धाडी करण्यात आल्यात, त्यात गुन्हे शाखेने कारवाई केली. परंतु संबंधित पोलीस स्टेशन व अधिकारी मात्र ठप्प बसले असल्याने यामध्ये अमरावती पोलीस विभागातील बडे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून आ. संजय खोडके यांनी अमरावती शहराच्या पोलीस प्रशासनात नव्याने बदल करण्याची गरज असल्याचे सभागृहासमक्ष सांगितले. मागील अधिवेशनातही अमरावती मधील एम.डी. ड्रग्स प्रकरणाबाबत लक्षवेधी मांडली असता ,यावर शासनाच्या वतीने योग्य धोरण ठरविणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता यासंदर्भात निर्णय घेणार का ? असा प्रश्न सुद्धा अधिवेशनातून करण्यात आला.
यावर शासनाच्या वतीने उत्तर देतांना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले कि, अमरावती शहरात डीआरआय तसेच क्राईम ब्रँच मार्फत एम. डी. ड्रग्सबाबत कारवाई करण्यात आली. हे खरे असून पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा कारवाई होत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रामुख्याने महानगर पालिकांच्या हद्दीमध्ये नवीन फोर्स तयार करून कार्यवाही करण्यात येत आहे. एम.डी. ड्रग्स विरोधी कारवाई व प्रतिबंध लावण्याला घेऊन महानगर स्तरावर ए.एन.डी.एफ. स्थापन करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी शासनाच्या वतीने आपल्या उत्तरात म्हटले आहे.