Jyotsna Wankhede:
दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी बल्लारपूर येथे नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर यांची विशेष बैठक संपन्न झाली.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शनासाठीमाजी खासदार आद. श्री अशोक नेते, एफ.डी.सी.एम. चे माजी अध्यक्ष व आदर्श नेते आद. श्री चंदनसिंह चंदेल, संघटन प्रभारी आद. श्री रामजी लाखिया,ज्येष्ठ नेते श्री राजेंद्र गांधी सर,तसेच भा.ज.पा. शहराध्यक्ष अॅड. रणंजय सिंह विशेष उपस्थित होते.
या बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीची रणनीती, संघटनेची मजबुती, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावरील बूथ रचनेला अधिक बळकट करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे संचालन भा.ज.पा. शहर सचिव श्री किशोर मोहुर्ले यांनी केले.
या प्रसंगी संघटन महामंत्री श्री मनीष पांडेय, महामंत्री श्री देवा वाटकर, महामंत्री श्री सतीश कनकम, माजी अध्यक्ष श्री काशीनाथ सिंह, ज्येष्ठ नेते श्री शिवचंद दिवेदी, श्री निलेश खरबडे, श्री समीर केने, श्री राजुभैया दारी, भा.ज.पा. महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष श्री मिथलेश खेंगर, ज्येष्ठ नेत्या सौ. रेणुका दुधे
तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.