Saturday, December 6, 2025
Homeबल्लारपूरवंचित बहुजन आघाडी तर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
spot_img

वंचित बहुजन आघाडी तर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी तर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

Jyotsna Wankhede:

दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर व्दारे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला चंद्रपूर (प.) जिल्हा उपाध्यक्ष मा. रूपचंद निमगडे व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकर तसेच, सुभाष थोरात ,रायपुरे साहेब आदी वरिष्ठ मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

 बल्लारपूर शहरातील विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते त्याच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले की, आगामी 2025 – 26 च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेने घेण्यात याव्या सोबतच वंचित बहुजन आघाडीने 15 ऑगस्ट 2025 पासून पत्र पाठवा मोहीम राबवून मान. जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती की, ज्या प्रकारे निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांना पोस्टल बायलेट दिला जातो. त्याचप्रमाणे किमान मागणीनुसार या देशाच्या मालकाला अर्थात मतदार राजाला पोस्टल बायलेटची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून ज्यांना ईव्हीएम वर विश्वास नाही ते मतदार मतपत्रिकेने विश्वासाने मतदान करू शकतील त्याचप्रमाणे बल्लारपूर शहरातील इतर समस्यांपैकी एक राष्ट्रीय महामार्गावरील असलेली नादुरुस्ती व्यवस्थित करून फुटपाथ तयार करण्यात यावा. सोबतच वंचित बहुजन आघाडीने वारंवार ज्या विषयावर पाठपुरावा केला तो म्हणजे बल्लारपूर शहरातील सदोनित नादुरुस्त असणारा रेल्वे गोल पुलाखालील रस्ता याविषयी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की, रेल्वे गोल पुलाखालील रस्ता कायम दुरुस्त करावा. अन्यथा पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशा मागणीच्या आशयाचे निवेदन मान. तहसीलदार बल्लारपूर, मान. एस.डी.ओ. बल्लारपूर, तसेच मुख्याधिकारी बल्लारपूर, यांना निवेदन सादर करण्यात आले.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुनी नगरपरिषद येथून छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून जन आक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली वेळी सादर करण्यात आली त्यावेळेस बहुसंख्येने महिला, पुरुष, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. ईव्हीएम च्या विरोधात घोषणा देत होते, मतपत्रिकेचे समर्थनाच्या घोषणा देत होते, गोलपुलिया दुरुस्त करण्याचे मागणी घोषणेच्या माध्यमातून करत होते. हायवे रस्त्यावर फुटपाथ पाहिजे याची मागणी करत होते हातामध्ये झेंडे आणि  मागण्यांचे फलक घेऊन झळकवत होते पुढच्या सरळ तहसील कार्यालयात मा. तहसीलदाराला निवेदन दिल्यानंतर परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत आला तिथे आल्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली व सरकारला आग्रह करण्यात आला दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेईल असा इशारा सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आपल्या भाषणातून दिला मोर्चामध्ये शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखाताई पागडे, तालुकाध्यक्षा नम्रता साव, जिल्हा महिला आघाडी सचिव सुप्रिया चंदनखेडे, शहर कोषाध्यक्ष प्रभूदासजी देवगडे, संघटक राकेश पेटकर, प्रियंकेश शिंगाडे, सुधाकर गेडाम, मनोज रघुवंशी, रत्नमाला निरांजने, वनमाला भसारकर, किरण रामटेके, पंचाताई विले, समता लभाने, प्रतिमा खेकारे, स्वीटी लोंढे, प्रज्ञा लोंढे, वत्सला तेलंग, प्रज्ञा नमनकर, अलका अलोने, सविताताई थुलकर, सुषमा उंबरकर, आशाताई भाले, रेखा मेश्राम, आदी अनेक कार्यकर्ते समर्थक शेकडोच्या संख्येत उपस्थित होते ही माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी कळविले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page