Sunday, December 7, 2025
HomeParbhaniकोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार.
spot_img

कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार.

कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार.

सेलू नगरपालिकेचा गलथानपणा  उघड.

Jyotsna Wankhede  : सेलू नगर परिषदेच्या वतीने रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती त्या अनुषंगाने शहरातील मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात आणले होते. त्यांच्या खाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे पण गरजेचे असताना तसे न घडल्याने एक गाय मरण पावल्याची तक्रार  रामेश्वर नारायण बरडे यांनी दिली आहे.
सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे .त्यामध्ये दि ३ /११/२५ रोजी रामेश्वर नारायण बरडे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती .हे समजताच बरडे यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरून घेण्याची विनंती केली.परंतु नगर परिषद मधील संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पावती बुक नाही असे सांगून दंड भरून घेण्यास चालढकल केली.व ती गाय देखील बरडे यांच्या ताब्यात दिली नाही .
दि.५/११/२५ रोजी सदरील गाय कोंडवाड्यातच मरण पावल्याची माहिती बरडे यांना मिळाली.
नगर परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व हलगर्जी पणामुळेच आपली गाय मरण पावली व तिच्यास मृत्यूस संबंधित कर्मचारीच जबाबदार असल्याची तक्रार बरडे यांनी केली आहे. गाईच्या मृत्यूमुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सदरील प्रकरणी दोषी विरोधात त्वरित योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी बरडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page