Sunday, December 7, 2025
HomeAmaravatiतक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूर येथील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
spot_img

तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूर येथील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूर येथील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

Jyotsna Wankhede:

श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती व्दारा संचालित तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय, दारापुर पूर्वीचे डॉ. सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय दारापूर ता. दर्यापूर, जि. अमरावती येथील १९ कर्मचारी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरही पगारविना आहेत. हे कर्मचारी महाविद्यालयात १० ते १७ वर्षांपासून काम करत आहेत. स्व. श्री . दादासाहेब गवई जिवंत असेपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन  दर महिन्याला मिळत होते परंतु २०१६ मध्ये विश्वस्त मंडळ बदलल्यापासून संस्थाचालकांनी मागील ७ वर्षांपासून ८ ते १० महीन्याचा पगार थकीत ठेवलेला आहे. मागील काही काळापासून कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिवाराच्या प्राथमिक गरजा भागविणे कठीण झाले आहे. मुलांचा शैक्षणिक खर्च, आईवडिलांच्या आजारपणाचा खर्च भागविणे कठीण होतं आहे. हे खर्च भागविण्यासाठी डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यातच संस्थेच्या उपाध्यक्षांनी पगारातील ५ ते २५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांनी परत करावी अशी अट टाकली परंतू १९ कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला म्हणून इतर  कर्मचाऱ्यांचा  पगार दिवाळीपूर्वी केला परंतू १९ कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या सांगितल्याप्रमाणे ऐकले नाही किंवा व्यवस्थापना विरोधात काही केले तर त्यांच्या वर आणखी कारवाई केली जाईल असे म्हटले.

यावर्षी मागील १० महीन्यात महाविद्यालयास ३.५० करोड शिष्यवृत्ती प्राप्त झाली व विद्यार्थ्यांनी अंदाजे १.५० करोड रुपये नगदी फी भरली आहे. महाविद्यालयाचा महीण्याचा पगार २५ लाख रुपये आहे. १० महीण्याचे  पगार दिल्यावरही महाविद्यालयात २ ते २.५० करोड शिल्लक असणे अपेक्षित आहे. परंतू संस्थाचालक म्हणतात काहीच पैसे शिल्लक नाहीत.

संस्थेने ७० पैकी ५१ कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२५ चा पगार दि. १८ ऑक्टोबर २०२५ ला केला परंतू १९ कर्मचाऱ्यांना दिवाळीसारख्या आनंदमय सणात देखील पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी संस्थेच्या प्रशासनाकडे तसेच तांत्रिक शिक्षण विभागाकडे तातडीने पगार वितरणाची मागणी केली आहे. परंतु प्राचार्य, संस्थेच्या प्रशासनाने व तंत्रशिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.

कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, “दररोजचे कामकाज आम्ही निष्ठेने पार पाडत असूनही, वेळेवर पगार न मिळणे अन्यायकारक व मनोबल खच्चीकरण करणारे आहे.”

आम्ही कर्मचारी वेळोवेळी तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इतरही महाविद्यालयांच्या कामाची जबाबदारी सांभाळतो परंतू आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही.

आमची पगारवाढ दरवर्षी व्हावी अशी आमची अपेक्षा असते परंतु प्राचार्य व संस्थेचे मंडळ आमची पगारवाढ करत नाही व दरवर्षी महागाई भत्ता दोन वेळा वाढतो परंतू आमचा मागील ५ वर्षांपासून महागाई भत्ता वाढलेला नाही. आता सातव्या वेतन आयोगानुसार पगार व ५३ टक्के महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे परंतु आम्हाला ६ द्या वेतन आयोगानुसार पगार व ७२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

या संदर्भात संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून कर्मचाऱ्यांचा थकीत पगार वितरित करावा, अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांना पुढील काळात शासन व माध्यमांमार्फत आपला मुद्दा मांडण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पत्रकार परिषदे नंतर विश्वस्त मंडळ व शासकीय कार्यालये यांना जाग येईल असे वाटते. जर आमचे थकीत पगार किंवा विश्वस्त मंडळ यांनी आमच्यावर काही कारवाई केली तर आम्ही येणाऱ्या १५ दिवसांत सर्वांना कळवू. आम्हाला वेतन मिळावे यासाठी आमची महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे उपाध्यक्ष व सचिव यांच्या सोबत मिटींग झाल्या परंतु पगारातील पैसे परत केले तरच पगार होईल अन्यथा होणार नाही व पत्रकार परिषदेने काहीही फरक पडत नाही अशी धमकी दिली.

तसेच आमची ७ वा वेतन आयोगानुसार पगार मिळण्यासाठी २०२२ पासून मुंबई हायकोर्टा, नागपूर बेंच मध्ये केस प्रलंबित आहे. त्याच्याही निकालाची आम्ही सातत्याने वाट बघत आहे. आम्ही कर्मचारी कोर्टात गेल्या मुळे आमच्यातील काही लोकांच्या बदल्या करण्यात आल्या व बदली काळातील ३ कर्मचाऱ्यांचे पगार अजून पर्यंत देण्यात आले नाही व वेळोवेळी त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे.

अन्याय व अत्याचार ग्रस्त कर्मचारी:

1. हेमंत धुमाळे

2. विलास तिखे

3. मंगेश ठाकरे

4. विनोद गाडगे

5. सादिक शेख

6. नईमी पटेल

7. महेंद्र होले

8. अमित साखरे

9. मंगेश मेटकर

10. सुनील सार्वे

11. योगेश बावनेर

12. प्रफुल्ल श्रीखंडे

13.  सचिन घुरडे

14. अंगज गणोरकर

15. सौ. हेमा काकड

16. गणेश येवतकर

17. सागर निर्मळ

18. मनोरंजन गवई

19. श्रीकृष्ण चव्हाण

संस्थेचे विश्वस्त

१. सौ. किर्तीताई अर्जून – अध्यक्ष

2. श्री. धरम अर्जून – उपाध्यक्ष

3. श्री. राजेश अर्जून – कोषाध्यक्ष

4. श्री. कमलाकर पायस – सचिव

5. डॉ. श्री. राजेंद्र गवई – सदस्य

6. डॉ. डी. टी. इंगोले, प्राचार्य

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page