Friday, December 12, 2025
HomeNagpurमहालेखाकार कार्यालय नागपूर दोन(PR-7) चा गलथान कारभार
spot_img

महालेखाकार कार्यालय नागपूर दोन(PR-7) चा गलथान कारभार

महालेखाकार कार्यालय नागपूर दोन(PR-7) चा गलथान कारभार

कर्मचाऱ्याला मनस्ताप: “पितांबर” चे केले “पितांबेर”, याआधीही केले होते बोंडे चे भोंडे 

अधिकारी करीत आहे डोळे बंद करून स्वाक्षऱ्या 

महालेखाकार कार्यालय नागपूर दोन (PR-7) चा गलथान कारभार समोर आला आहे. विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शंकरपूर तालुका: चिमुर जिल्हा: चंद्रपूर येथून सेवानिवृत्त झालेले श्री. पितांबर तुळशीराम वांढरे वरिष्ठ लिपिक यांच्या पेन्शन केस सूचनापत्र मध्ये त्यांचे नाव “पितांबर” ऐवजी “पितांबेर” करण्याचा उपक्रम या कार्यालयाने केला आहे. दिनांक: 31/07/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही.

या आधी सुद्धा या कार्यालयाने  कोरपणा तालुक्यातील  एका कर्मचाऱ्यांचे “बोंडे” ऐवजी “भोंडे” असे आडनावांमध्ये चूक केली होती.

या सर्व चुका यांना चिरीमिरी न प्राप्त झाल्यामुळे करत असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व चुका केल्यामुळे कर्मचाऱ्यांना चार-पाच महिने उशिरा पेन्शन मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यालयात कॅमेऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे हे सर्व घडत असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यालयामध्ये गेले असता संबंधित  लिपीक हा जाग्यावर राहत नसून हा दोन-तीन घंटे उशिरा फीरफार होऊन येत असल्याची चर्चा सुरू आहे.

 या कार्यालयाला पेन्शन केस देत असताना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक दिले जाते हे सर्व पाहून न पाहता डोळे बंद करून अधिकारी स्वाक्षरी करत असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे तू लिहिल्यासारखं कर मी वाचल्यासारखे करतो असे वातावरण निर्माण केले असल्याची चर्चा सुरू आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page