हिंगलाज भवानी हायस्कूल चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Jyotsna Wankhede:
मराठा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित बाबुपेठ चंद्रपूर स्थित हिंग्लाज भवानी हायस्कुल येथे 6 डिसें 2025 रोजी विश्वरत्न महामानव डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र आभिवादन कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष साठे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला चढवली व शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष साठे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर शाळेतील इयत्ता 9 वी तील विद्यार्थी अंशू मुळे या विद्यार्थ्यानी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्री. श्रीराम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री. विकास रामटेके सर यांनी मानले . कार्यक्रमला शाळेचे शिक्षक श्री कपिल भूषणवार, पाखमोडे सर, मंगेश श्रीरामे, कु. महाकाळकर मॅडम कु. राखडे मॅडम कु. बावणे मॅडम व सर्व विध्यार्थी आणि परिसरातील पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.