Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeParbhaniआपलं गावच आपलं तीर्थ अन आपली शाळा आपलं मंदिर झालं पाहीजे -शिरीष...

आपलं गावच आपलं तीर्थ अन आपली शाळा आपलं मंदिर झालं पाहीजे -शिरीष लोहट.

आपलं गावच आपलं तीर्थ अन आपली शाळा आपलं मंदिर झालं पाहीजे -शिरीष लोहट.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरजवळा येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Jyotsna Wankhede: मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरजवळा मध्ये दि.13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता पालक सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या पालक सभेत शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ होगे हे होते. व्यासपीठावर आदरणीय शिरीष लोहट, बलभीम माथेले सर, तुरे सर, दिलीप लाड,विनोद शेंडगे व मुरलीधर सिराळ हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सभेत वृक्षारोपण व निबंध लेखन, डिजिटल शिक्षण व स्मार्ट वर्गांचा वापर, शालेय शिस्त व शैक्षणिक गुणवत्ता वाढ, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थी उपस्थिती वाढविणे, शाळेतील भौतिक सुविधा व स्वच्छता, CCTV कॅमेऱ्यांद्वारे शाळा सुरक्षितता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमल बजावणी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शिस्त, अभ्यासातील सातत्य व नैतिक मूल्यांचे संवर्धन, रात्र अभ्यास गट दररोज बसवणे, त्यात पालकांचा सक्रिय सहभाग यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.सभेच्या शेवटी पालकांच्या सूचना व समस्या ऐकून घेण्यात आल्या. शाळेच्या प्रगतीसाठी शाळा– पालक–समाज यांचा समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव सोळंके सर यांनी केले व आभार प्रदर्शन आवचार सर यांनी केले. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक  काळदाते सर,पानझाडे सर,जुकटे सर, केंद्रे सर,लाड सर तसेच श्रीमती वैशाली विष्णू यांनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page