Wednesday, April 15, 2026
HomeParbhaniसेवानिवृत्त शिक्षकाची ९७ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक.
spot_img

सेवानिवृत्त शिक्षकाची ९७ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक.

सेवानिवृत्त शिक्षकाची ९७ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील मौलाना आझाद नगर मधील सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ शंकरराव कुरमुडले यांना आरोपींनी वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकावरून 8 एप्रिल रोजी आरोपीच्या दूरध्वनीवर फोन व व्हॉटसअपवरून व्ही डी ओ द्वारे अटक करण्याची धमकी देत 97 लाख 83 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे .

कुरमुडले यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गु र न 181/2026 नुसार सेलू पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पुढील तपास करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार आरोपींनी विविध दूरध्वनीवरून फिर्यादिस फोन करून अटक करण्याची धमकी दिली .व व्हॉट्स ॲप वरून वेळोवेळी व्ही डी ओ कॉल द्वारे संपर्क करून तुमचा आधारकार्ड वापरून तुमच्या नांवाने एअर टेल कंपनीचे कार्ड घेऊन व पॅनकार्ड काढून कॅनरा बँक मुबंई येथे खाते काढले आहे .व या खात्यावरून विविध योजनेचे आमिष दाखवून बऱ्याच लोकांकडून दोन कोटी जमा करून नरेश गोयल यांना पाठवून त्या बदल्यात वीस लाख रुपये कमिशन घेतले आहे.व लोकांना परताव्यासह रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली आहे .असे सांगून फिर्यादीच्या आर्थिक व्यवहाराची व कौटुंबिक पार्श्वभूमी बाबत विचारपूस करून त्यांना पोस्टातील एफ डी ,पेन्शन लोन ,सोने कर्ज काढायला लावून वेळोवेळी वेगवेगळे खाते क्रमांक देऊन फिर्यादी व त्याच्या पत्नीच्या खाते क्रमांकावरून आर टी जी एस व चेक द्वारे एकूण 97 लाख 83 हजार रुपये घेऊन फसववणूक केली आहे .

सदरील घटना तुम्ही व पत्नी शिवाय कोणाला सांगितली तर तुमची पेन्शन बंद करून मुलगा निलेश याची नोकरी देखील घालण्याची धमकी दिली आहे.

कुरमुडले यांच्या या फिर्यादी वरून संबंधित फोन वापर कर्ता रवी शर्मा व इतर अज्ञात आरोपितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page