Friday, June 19, 2026
HomeParbhaniप्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
spot_img

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा- डॉ. संजय रोडगे.

Jyotsna Wankhede: सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आज प्रेसिडेन्सीयल टेस्ट, डॉ. होमी भाभा परीक्षा तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सकाळच्या परिपाठात डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमास श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेशी जुळवून घेत जबाबदारीने आणि सकारात्मक पद्धतीने तिचा वापर केला पाहिजे, असे स्पष्ट केले. भविष्या तील शिक्षण व करिअरसाठी तंत्रज्ञान समजून घेणे अत्याव श्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स लॅबमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली व पालकांनी या सुविधांची दखल घ्यावी, असे आवाहन केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचे कौतुक करण्यात आले. मान्यवरांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page