Monday, May 25, 2026
HomeParbhaniप्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे 'राष्ट्रीय गणित दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला.
spot_img

प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे ‘राष्ट्रीय गणित दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे ‘राष्ट्रीय गणित दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.

Jyotsna Wankhede: श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रॉस्परस  पब्लिक स्कूल येथे, २२ डिसेंबर रोजी, महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.   मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी रामानुजन यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांनी गणितामध्ये केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रामानुजन यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गणितातील अनेक क्लिष्ट समस्या सोडविल्या, जे विद्यार्थ्यां साठी प्रेरणादायी आहे. त्यानंतर, ‘रामानुजन: एक गणितीय जादूगार’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, गणितीय कोडी सोडवणे आणि प्रात्यक्षिके यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. गणित शिक्षक राजेंद्र जाधव व योगिता कदम यांनी गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले, तर काही विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या कार्यावर आधारित भाषणे दिली.कार्यक्रमाच्या शेवटी, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास आवडीने करण्याची प्रेरणा दिली आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानले. या दिवसाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. यावेळेस श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे तसे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रगती क्षीरसागर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page