Thursday, July 30, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबाबांच्या स्वप्नपूर्तिसाठी झटने हिच खरी श्रद्धांजलि.....! धम्मचारी ललितसिद्धि

बाबांच्या स्वप्नपूर्तिसाठी झटने हिच खरी श्रद्धांजलि…..! धम्मचारी ललितसिद्धि

बाबांच्या स्वप्नपूर्तिसाठी झटने हिच खरी श्रद्धांजलि…..! धम्मचारी ललितसिद्धि

Jyotsna Wankhede:
बाबासाहेबानी तुमचा आणि माझा विचार केला. म्हणून आपन संपन्न झालो. परंतु यासाठी त्यांना चार मुले, पत्नी आणि खूप काही गमवावे लागले. शेवटच्या क्षणी प्रबुद्घ भारताचे स्वप्न घेवूनच ते परिनिर्वानास प्राप्त झाले.  त्यांच्या स्वप्नपूर्तिसाठी झटने हिच खरी श्रद्धांजलि ठरेल असे प्रतिपादन धम्मचारी ललितसिद्धि यांनी केले. ते त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुर द्वारा परिनिर्वाण दिन व मनुस्मृति दहन दिनानिमित्त सुभाष हॉल बल्लारपुर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सुरुवातिला रॅलीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अभिवादन करण्यात आले. रॅलीचे आगमन हॉलमधे होताच कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाना  वंदन करून झाली. संध्या गावंडे, प्रतिज्ञा वानखेड़े आणि रत्नमालाताई जीवने यांनी पाली पूजा घेतली. भास्कर भगत यांनी एक सुंदर गीत सादर केले. धम्मचारी रत्ननायक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी धम्मचारी अमलदर्शी हे सुद्धा मंचावर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर धम्मचारी ललितसिद्धि यांनी दिड तास मार्मिक आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. श्रोतावर्ग अगदी तल्लीन आणि मंत्रमुग्ध होवून ऐकत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र भास्कर भगत,तर आभार प्रदर्शन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले.सरोज नगराळे,विध्या भगत, निता कोरडे यांनी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता केली.मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page