Friday, September 4, 2026
spot_img
HomeParbhaniडॉ.रोडगे यांनी सुरभि महोत्सवातून बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उभे केले - गजानन...

डॉ.रोडगे यांनी सुरभि महोत्सवातून बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उभे केले – गजानन वाघमारे.

डॉ.रोडगे यांनी सुरभि महोत्सवातून बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उभे केले – गजानन वाघमारे.

सुरभि महोत्सवातील ‘रंग मराठी मातीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.

माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश गजर माऊलीचा महानाटिकेतून दिला.

Jyotsna Wankhede: येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा निमित्य उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा रंग मराठी मातीचा व गजर माऊलीचा महानाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम (२७) वार गुरुवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन सेलू येथील गटशिक्षणा धिकारी गजानन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, रामराव बोबडे, गुलाब ताठे, डॉ. वर्षा गिरी, डॉ. आदित्य रोडगे, शिंदेटाकळीच्या सरपंच अश्विनी पवार, लाडनांदराचे सरपंच रामेश्वर गायकवाड, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.आशिष डख, डॉ.राजेंद्र गात, डॉ. दिगंबर घोडके, अॅड कृष्णा शेरे, संदीप बहिवाल,  ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिका पवार, दिलीप डासाळकर, अविनाश चव्हाण, अनिल गजमल, संदीप करवा, निळकंठ काष्टे, प्रा. राजाराम झोडगे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शाळेच्या मुख्याध्यापक कैलास ताठे, हरिभाऊ कांबळे, शालिनी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रतिवर्षी प्रमाणे इयत्ता १० वर्गातून कृष्णा रासवे या विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट युवराज तर सई सोनटक्के हिला सर्वोत्कृष्ट युवराज्ञी या पुरस्काराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार म्हणजे केवळ एका क्षेत्रातील यश नसून, विद्यार्थ्या च्या सर्वांगीण विकासाचा सन्मान असतो. या मध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, शिस्त आणि वर्तन, हजेरी, सहशालेय उपक्रम, क्रीडा नैपुण्य, नेतृत्व गुण आदीचे मुल्याकन करण्यात येते. या पुरस्कारातून विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व विकाससह प्रोत्साहन मिळते.

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्धेशाने सुरभी महोत्सव आहे. एक महिन्याहून अधिक विद्यार्थ्यांनी केलेल्या सरावाचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बाल कलाकार करत असतात. त्यांना आत्मविश्वास व प्रोस्ताहन उपस्थित पेक्षकाकडून अपेक्षित आहे. आमचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहावे या दृष्टीकोनातून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. असे बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले.सेलू शहर हे मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी असून श्रीराम प्रतिष्ठाने आपल्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामधून सेलू शहराची एक वेगळी ओळख डॉ. रोडगे यांनी निर्माण केली आहे. उपस्थित पालकांना विनंती की,  विद्यार्थ्यांना खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण अंगी उतरवले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. संस्कारची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते. डॉ.रोडगे यांनी सुरभि महोत्सवातून बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उभे केल्याचे दिसून आले असे प्रतिपादन गजानन वाघमारे यांनी केले. रामराव बोबडे बोलताना म्हणाले की, सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम असून डॉ. संजय रोडगे यांनी सेलू शहरात शैक्षणीक वातावरणास चांगले वळण देत असल्याचे आज प्रत्यक्षदर्शी येथे आल्यास दिसले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थांना व्यासपीठ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले हे विद्यार्थी दशेच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे.

गजर माऊलीचा महानाटिकेत १२० हुन अधिक बाल कलाकारांणी आपल्या कला प्रकारातून संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन पाटावर आधारित नाटिका सादर केली. यामध्ये संत ज्ञानेश्वर , संत निवृत्ती , संत सोपान, संत मुक्ताबाई, विठ्ठलपंत, रुख्मिणी, विसोबापंत, मारबा, चांगदेव, मुग्दल शास्त्री, पाटील, नागा साधू, रायबा आदी प्रमुख पात्र विद्यार्थी विद्यार्थिनीनी साकारले महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिची ओळख करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संत परंपरा आणि वारकरी संस्कृतीची ओळख निर्माण झाली यामध्ये पैठणची धर्मसभा आणि रेड्याच्या मुखातून वेद वदवणे., भिंत चालवण्याचा प्रसंग, चांगदेव भेटीचा प्रसंग, ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाची निर्मिती आणि पसायदान आदी प्रसंगाणी मन हरुपून गेले. गजर माऊलीचा महानाटिकेतून “माणुसकी हाच खरा धर्म” आणि “भेदभाव सोडून एकत्र येणे” हा संदेश देण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणेश वंदना, गोंधळ, धनगर गीत, शेतकरी गीत कोळी गीत, बंजारा नृत्य, वारकरी गीत, लावणी आदी महाराष्ट्रातील लोकधारावर आधरित विविध सामुहिक नृत्याचे बाल कलाकारांनी सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, पालक सेलू शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक कैलास ताठे यांनी केले. सूत्रसंचालन संजय ठाकर, दिगंबर टाके, संदीप आकात, मिताली ढाले, हर्षदा काष्टे, समृद्धी गाडेकर, अंकिता कदम, साधना काकडे, मृण्मयी गीते यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page