Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeParbhaniआम्ही कलाकार ग्रुप’कडून महंमद रफी यांना स्वर सुमनांजली.

आम्ही कलाकार ग्रुप’कडून महंमद रफी यांना स्वर सुमनांजली.

आम्ही कलाकार ग्रुप’कडून महंमद रफी यांना स्वर सुमनांजली.

Jyotsna Wankhede: भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायक पद्मश्री महंमद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेलू येथील ‘आम्ही कलाकार ग्रुप’ च्या वतीने भावपूर्ण स्वरसुमनांजली कार्यक्रमाचे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी गेना कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात रफी यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात सचिदानंद डाखोरे, गंगाधर कान्हेकर, शिरीष संघई, डॉ आशिष मेहता, डॉ राजेंद्र मुळावेकर, सायली दिग्रसकर, उजैनी संघई, स्वाती तांबे, दीपक देवा, अनघा पांडे, संतोष कुलकर्णी, संजय मंडलिक, डॉ. विलास मोरे आदी कलाकारांनी रफी यांच्या भक्तिगीतेपासून रोमँटिक व देशभक्तीपर गीतां पर्यंत अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. “शोधीशी मानवा”, “बुरा मत सुनो”, “जाग दिल ये दिवाना”, “जनम जनम का साथ है”, “ये दोस्ती हम नही तोडेंगे”, “गुलाबी आंखे”, “तुम्हारे प्यार में हम” यांसारख्या गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. रफी यांच्या आवाजातील भाव, सूर आणि गाण्यांमधील संवेदना यांचे महत्त्व यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमास संगीतप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘आम्ही कलाकार ग्रुप’च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सूत्रसंचलनअशोक जैस्वाल यांनी खूमासदार पणे केले. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला रफी साहेबांच्या संगीताचा वारसा समजून घेण्याची संधी मिळते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही कलाकार ग्रुपच्या प्रकाश सुरवशे,चंद्रहास पटेल,मुनीरभाई,रवी मुळावेकर,पुनमचंद खोना,गिरीष दीक्षीत,अरूण पांडे,मधुकर काष्टे,डाँ.सौ.मेहता,सौ.डाखोरे या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page