जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे सहाय्यक शिक्षक राजू वानखेडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
Jyotsna Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 31/12/2025 रोजी राजू वानखेडे सहाय्यक शिक्षक यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर सहाय्यक शिक्षक तसेच
सत्कारमूर्ती राजू वानखेडे, पत्नी ज्योत्स्ना वानखेडे व मुलगी ऋतुजा वानखेडे यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
एस. एन. लोधे मॅडम यांनी ” आनंद या जीवनाचा ” गीत गायन केले. प्रास्तविकात यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, सरांचे नियोजन व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. इंद्रभान अडबाले यांनी सरांच्या आयसीटी मध्ये योगदानाबद्दल माहिती दिली. एस. एम. चव्हाण यांनी सांगितले की, सर विद्यार्थ्यांना मदत करण्यामध्ये व पालकासोबत संपर्क करण्यामध्ये पुढे असतात.
एम. डी. टोंगे यांनी सांगितले की, सर प्रसंगी मदत करण्यामध्ये व शिकण्यामध्ये पुढे असतात.(एम. एस. सी.; डी. एस. एम.; पी.
एचडी.),
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की सर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या तळमळीमुळे त्यांनी विद्यार्थ्यांची गरज वेळोवेळी भागवली आहे.
याप्रसंगी राजू वानखेडे, पत्नी ज्योत्स्ना वानखेडे व मुलगी ऋतुजा वानखेडे यांचा मुख्याध्यापक बी. बी. भगत यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
राजू वानखेडे व ज्योत्स्ना वानखेडे यांनी सत्काराला मनोगत व्यक्त केले.
संचालन एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे आदी शिक्षकेतर कर्मचारी सहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.