Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeBhamahpuri*ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या...

*ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…*

*ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…*

*ज्योत्स्ना वानखेडे*
*प्रकरण काय आहे?*
1.  *पहिली चोरी – दि. 17.07.2026*
    तक्रारदार *शंतनू प्रकाशराव बगमारे*, रा. वि विद्यानगर, ब्रह्मपुरी यांनी तक्रार दिली की मौजा अडयाळ बारमध्ये अज्ञात आरोपींनी शटर वाकवून आत प्रवेश करून *₹1,66,805/-* चा विदेशी दारू व इतर साहित्य चोरून नेले.
    याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात *गु.रजि.क्र. 575/2026 कलम 305(अ), 331(4) भा.न्या.सं.* नुसार गुन्हा नोंद झाला.
2.  *दुसरी चोरी – 8 दिवसांनंतर*
    खरखाडा, ता. ब्रह्मपुरी येथील *अमीत दादाजी बनकर*, वय 39 वर्षे, रा. रूई यांच्या बारचे मागील शटर वाकवून आत प्रवेश करून *₹2,13,227/-* चा विदेशी दारू व इतर साहित्य चोरीला गेले.
*पोलिसांची कारवाई:*
दोन्ही चोरीचे आव्हान ब्रह्मपुरी पोलिसांनी स्वीकारले. ठाणेदार *मा. पो.नि. प्रमोद बानबले* यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने 2 वेगवेगळे पथक तयार केले.
CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
*अटक करण्यात आले आरोपी – एकूण 4 जण:*
1.  *सौरभ अनिल वाघाडे* – वय 26 वर्षे, रा. बामणी, ता. नागभिड, जि. चंद्रपूर
2.  *जगदिश दिपक शेंद्रे* – वय 25 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. राममंदीर चौक, कॉम्प्लेक्स जवळ, पटवारी कार्यालयाजवळ, नागभिड
3.  *अभिषेक अशोक अलोने* – वय 26 वर्षे, रा. कुणघाडाचक, ता. नागभिड, जि. चंद्रपूर
4.  *विशाल दिवाकर ठाकरे* – वय 23 वर्षे, रा. मांगली अरब, ता. नागभिड, जि. चंद्रपूर
पोलिसांनी वरील 4 जणांना गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली *विदेशी दारू व इतर मुद्देमाल* हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
*गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त:*
सदर गुन्ह्यादरम्यान आरोपींनी वापरलेली वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत.  मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1.  *पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी* – किं.अं. ₹5,00,000/-
    गाडी क्र. *MH 29 AR 5844*
2.  *निळ्या रंगाची मारुती सुझुकी बलेनो कार* – किं.अं. ₹7,00,000/-
    गाडी क्र. *MH 33 AD 1114*
3.  *मारुती सुझुकी कंपनीची एक्सप्रेसो कार* – किं.अं. ₹4,00,000/-
    गाडी क्र. *MH 34 CY 7487*
पोलीस ठाण्यात दाखल असले दोन्ही बार फोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास *स.पो.नि. मनोज खडसे* हे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी:*
ही कारवाई *मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी सा.*, *मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे सा.*, *मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी श्री. साहील झरकर सा.* आणि *पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले सा.* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ब्रह्मपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकातील:
– *सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे सा.*
– *पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलींद नैताम*
– *पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ठ रंगारी*
यांनी सदर कारवाई केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page