Tuesday, May 5, 2026
HomeParbhaniवालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह.
spot_img

वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह.

वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह.

राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम. 

Jyotsna Wankhede: दि.02 फेब्रु.राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्य तिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे वालूर ता. सेलू गावातील १५ वे वर्ष असून गुरुवारी (ता. १) या भव्य सप्ताहास प्रारंभ होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त १ जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद्भागवत कथा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, १२ ते ३ या वेळेत नारायण बुवा पाठक वालूरकर भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८. ३० ते १०. ३० हरिकिर्तन, रात्री ११ ते ४ हरीजागर होणार आहे.शंतनू महाराज पाठक वालूरकर, पुरूषोत्तम महाराज वालूरकर, रमेश महाराज जोगवाडकर, दत्तराव महाराज बडे, माणिक महाराज रेंगे, गंगाधर महाराज मुंढे, मधुकर महाराज घोळवे यांचे हरि किर्तन होणार आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी ११ ते १ सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह दरम्यान होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम वमहाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
□ मोफत मंडप डेकोरेशन व अन्नदाते….
वालूर गावातील मारोती मंडप डेकोरेशनचे चालक बंडू सखाराम पालवे यांच्यातर्फे मंडप डेकोरेशन मोफत सेवा आहे. दरम्यान निवृत्ती लहानाप्पा लांडे, दादाराव मारोती मुंढे, बाळाजी मानाजी घुगे, भगवान बाबाराव दराडे, पांडुरंग विठोबा दराडे, बाबुराव मारोतराव मुंढे, कृष्णा आश्रोबा मुंढे, नामदेव साहेबराव मुंढे, शामराव बाबुराव बोडखे, बाबाराव भिमराव बोडखे यांच्यातर्फे दररोज महाप्रसाद होणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page