*जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पालक-
शिक्षक संघ 2026 – 27 स्थापन*
*ज्योत्स्ना वानखेडे*: जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेच्या संघाची सभा बुधवार दिनांक: 05/08/2026 रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले.
त्या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. या सदर सभेचे अध्यक्ष एस. एम. बोबडे व उपाध्यक्ष मनिषा पपू महानंद उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एम. बोबडे यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून पालक-शिक्षक संघाची सभा सुरू करण्यात आली.
नवीन कार्यकारणी याप्रमाणे आहे.
अध्यक्ष – श्री संदीप महादेवराव बोबडे
उपाध्यक्ष – सौ. मनिषाताई पप्पू महानंद
सचिव – श्री. आर. बी. अलाम
सहसचिव – सौ. सुकेशनी मनोज निमकर
सदर सभेसाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये यु. के. रांगणकर सर, एस. एन. लोधे मॅडम, एस. एम. चव्हाण सर, जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले, मंजु गवई,आम्रपाली वेले, मनीषा उईके ,वर्षा मांदळे, मनिषा बोर्रीकर,लक्ष्मी कन्नौजवार, राकेश उईके, राशी वेले, आनंदी गवई.
सभेला यु. के. रांगणकर सर, एस. एन. लोधे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण एस. एम. बोबडे मुख्याध्यापक यांनी केले.
प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एम. चव्हाण आणि आभार प्रदर्शन एस एन लोधे मॅडम यांनी केले.