Thursday, January 22, 2026
HomeParbhaniन्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.
spot_img

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

न्यू हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा संपन्न झाला. सरस्वती व कै विनायकराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धनंजय भागवत तर दशरथ कांबळे, रामदास रोडगे, अंकुश राऊत अशोक पौळ, अश्विनी नाडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले. तर दत्तात्रय सोळंके, रामदास रोडगे, दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे, प्रनयना तेलगोटे, रामेश्वर गाडेकर आदींनी मनोगत तर किंजल कांबळे, अश्विनी शिंदे, प्रणाली राऊत, सचिन कसबे, अदित्य शिंदे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटेवाड जी के यांनी तर आभार धनंजय मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे,एस आर रोंटेवाड, बाबासाहेब आव्हाड, नारायण काष्टे, अंगद मोरे, विष्णू गजमल यांनी परिश्रम केले. या कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page