Wednesday, February 11, 2026
HomePoliceबल्लारपूर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
spot_img

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

ज्योत्स्ना वानखेडे: शहरातील साईबाबा वार्ड परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. नितेश उर्फ बापू किसन मसराम (वय २३), रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.
         मंगळवार, दि १३ जानेवारी रोजी सायंकाळी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार दारू, जुगार तसेच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना, खात्रीशीर माहिती मिळाली की साईबाबा वार्डातील जुन्या घरात एक इसम प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करीत आहे.
      मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. झडतीत आरोपी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला. त्याच्या घरातील बेडखाली ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत नायलॉन मांजाच्या मोठ्या व लहान अशा एकूण १० चकऱ्या सापडल्या. यामध्ये मोनोफिल गोल्ड कंपनीच्या प्रत्येकी एक हजार रुपये किमतीच्या पाच मोठ्या चकऱ्या तसेच हिरो प्लस कंपनीच्या प्रत्येकी सातशे रुपये किमतीच्या पाच लहान चकऱ्यांचा समावेश असून, एकूण ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
        आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम ५ व १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
         सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर खान पठाण, पोहवा संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, सुनील कामतकर, विकास जुमनाके, पोअं सचिन अल्लेवार, लखन चव्हाण, खंडेराव माने, शरदचंद्र कारूस, मपोअं अनिता नायडू यांनी केले.
          प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने अशा बेकायदेशीर विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page