Wednesday, May 6, 2026
HomeParbhaniसेलू नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी साईराज बोराडे यांची सर्वानुमते निवड.
spot_img

सेलू नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी साईराज बोराडे यांची सर्वानुमते निवड.

सेलू नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी साईराज बोराडे यांची सर्वानुमते निवड.

हेमंतराव आढळकर, विनोद बोराडे, अशोक काकडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू नगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांच्या बुधवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षते खाली आयोजित पहिल्या सर्व साधारण सभेत उपाध्यक्ष आणि तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते साईराज मुकेशराव बोराडे, तर स्वीकृत सदस्य म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर (काँग्रेस), माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ बोराडे आणि जिपचे माजी सभापती अशोक आण्णासाहेब काकडे (भाजप) यांचीही बिनविरोध सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी ही माहिती दिली.  उपाध्यक्षपदासाठी साईराज बोराडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सेलू पालिकेची एकूण सदस्य संख्या २६ आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्य क्षासह संख्याबळ एकूण १५ आहे. त्यामुळे त्यांचे दोन, तर कॉंग्रेसचे एकूण सात सदस्य आहेत. त्यांचा एक असे एकूण तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला सर्व नवनिर्वाचित सदस्य, उपमुख्याधिकारी बी.एस. चव्हाण, एन.आर. दायमा, विजय शहाणे, मोहंमद युनुस आदींची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page