शिंदे टाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.
सेलू तालुक्यात भाजपचा वाढता प्रभाव.

ज्योत्स्ना वानखेडे: (ता. 22) रोजी सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा जाहीर प्रवेश सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. मेघनादीदी साकोरे बोर्डीकर तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजपाच्या विकासा भिमुख धोरणांवर विश्वास ठेऊन कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.डॉ. संजय रोडगे यांच्या कार्यशैलीवर, विकासकामांवर तसेच जनतेशी असलेल्या थेट संवादावर विश्वास ठेवून हा प्रवेश झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रवेशामुळे सेलू तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अलिमोद्दीन शेख, संतोष गायकवाड, माऊली कोल्हे, प्रमोद कदम, राजेभाऊ घनवट, सतीश बारस्कर, बंटी बारस्कर, दत्ता चव्हाण, दिलीप गायकवाड, दादाराव गायकवाड, दिगंबर धोत्रे, रंजीत गायकवाड आदींचा समावेश आहे.यावेळी डॉ. आदित्य रोडगे,मुकेश पवार,ॲड. दत्ताराव कदम,कैलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय रोडगे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.