Monday, May 4, 2026
HomeChandrapurडॉ. गोपाल मुंदडा यांचे निधन; चंद्रपूरने गमावले सेवाभावी व्यक्तिमत्त्व
spot_img

डॉ. गोपाल मुंदडा यांचे निधन; चंद्रपूरने गमावले सेवाभावी व्यक्तिमत्त्व

डॉ. गोपाल मुंदडा यांचे निधन; चंद्रपूरने गमावले सेवाभावी व्यक्तिमत्त्व

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावपूर्ण शोकसंवेदना

Jyotsna Wankhede: चंद्रपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, सामाजिक जाणीव आणि सेवाभावातून माणुसकी जपणारे डॉ. गोपाल मुंदडा यांच्या निधनाने चंद्रपूर शहरावर शोककळा पसरली आहे. शहराने एक हसतमुख, सेवाभावी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशी अत्यंत भावनिक शोकसंवेदना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

डॉ. मुंदडा हे केवळ कुशल बालरोगतज्ज्ञ नव्हते, तर समाजाच्या वेदना ओळखून त्यावर उपाय शोधणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष शहराच्या विविध प्रश्नांसाठी अथक लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या कार्याची दखल घेत महानगरपालिका तसेच विविध संस्थांकडून चंद्रपूर बचाव संघर्ष समितीला अनेक सन्मान मिळाले.

डॉ. मुंदडा यांच्या रूपाने शहराने एक सेवाभावी डॉक्टर, जनतेचा जिव्हाळ्याचा आधार आणि सदैव हसतमुखाने मदतीला धावून येणारा माणूस गमावला आहे. त्यांचे कार्य आणि आठवणी चंद्रपूरच्या मनात सदैव जिवंत राहतील, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
डॉ. मुंदडा यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page