Monday, April 20, 2026
HomeProjectबाजपेयी कॉम्प्युटर बल्लारपूर तर्फे गव्हर्नमेंट आय. टी.आय. विसापूर येथे ए.आय. कार्यशाळा
spot_img

बाजपेयी कॉम्प्युटर बल्लारपूर तर्फे गव्हर्नमेंट आय. टी.आय. विसापूर येथे ए.आय. कार्यशाळा

बाजपेयी कॉम्प्युटर बल्लारपूर तर्फे गव्हर्नमेंट आय. टी.आय. विसापूर येथे ए.आय. कार्यशाळा

Jyotsna Wankhede:
बाजपेयी कॉम्प्युटर, बल्लारपूर तर्फे दिनांक 06/02/2026 रोजी गव्हर्नमेंट आय.टी.आय. विसापूर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) विषयावर एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी एम.के.सी.एल. डी.सी.यू. चंद्रपूर येथील सेंटर को-ऑर्डिनेटर श्री लक्ष्मीकांत कांबळे सर व त्यांच्या टीममधील श्री सचिन शंभरकर सर तसेच प्रेशिता बोड़ेकर मॅडम उपस्थित होते. यासोबतच बाजपेयी कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. राखी संजय बाजपेयी व अधिवक्ता संजय बाजपेयी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री लक्ष्मीकांत कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
गव्हर्नमेंट आय.टी.आय. विसापूर येथील संगणक विभागाच्या प्रमुख सौ. कळसकर मॅडम, तसेच शिक्षकवृंद गायत्री जवारकर मॅडम, श्री दगडे सर, श्री काले सर आणि श्री खोब्रागडे सर यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यशाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी कार्यशाळेचे मनापासून कौतुक केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page