महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास विभागाद्वारे छत्रपती शिवाजी जयंती उत्साहात साजरी

ज्योत्स्ना वानखेडे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे इतिहास विभागाद्वारे साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर चौरे,(इतिहास विभागप्रमुख) डॉ. बी डी. चव्हाण,प्रा. रोशन साखरकर, प्रा.दिवाकर मोहितकर, प्रकाश मेश्राम, वरिष्ठ लिपिक याची विचार मंचावर उपस्थिती होती. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.रजत मंडल यांनी उपस्थिताना छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा दिल्या,तर डॉ. किशोर चौरे (इतिहास विभागप्रमुख) यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, ” छत्रपती शिवाजी महाराज या देशाला लाभलेले एक अनमोल रत्न असून त्यांनी आपल्या प्रशासनात बहुजन समाजाला विविध पदावर नेमले, ते जनतेच्या भावना समजून घेणारे न्यायप्रिय, दूरदर्शी, कर्तव्यनिष्ठ राजे होते, स्वराज्याच्या माध्यमातून प्रजेला शूरक्षितात, स्वाभिमान आणि न्याय दिला, या कार्यक्रमला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.








